अरूणाचल प्रदेश : भारत -चीन सीमेवर आज (शनिवारी ) सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले.  सकाळी सुमारे ४.०४ मिनिटांनी भूकंप  झाला.  या भूकंपाची तीव्रता सुमारे ६.४ रिक्टर स्केल इतकी होती.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरूणाचल प्रदेशमध्ये झालेल्या या भूकंपामध्ये अजूनही जीवितहानी, वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. भारत चीन या सीमेवर भूकंप  झाल्याने सुरक्षा व्यवस्था कोणत्या स्वरूपाचे नुकसान झाले याबाबत तपासणी सुरू आहे. 


भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार, भूकंप पहाटे ४ वाजून ४ मिनिटांनी झाला आहे. तसेच भूकंपाचे केंद्रस्थान जमीनीच्या आत सुमारे १० किलोमीटर होते.  


२०१७ वर्षाची सुरूवात भूकंपाने झाली होती. ४ जानेवारीला झालेल्या भूकंपाचे केंद्रस्थान कुरंग कुमय जिल्ह्यामध्ये होते. हा भूकंपाचा धक्का रात्री १ वाजून २० मिनिटांनी जाणवला होता.