Video Shot At Cafe Rape Case: ओदिशामधील कटकमध्ये बलात्काराची एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणात पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीबरोबरच सहा जणांना अटक केली आहे. एका कॉलेजच्या विद्यार्थिनीवर या सर्वांनी सामुहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. या तरुणीचे अश्लील व्हिडीओ या लोकांकडे होते. हे व्हिडीओ लिक करण्याची धमकी देत या सहा जणांनी अनेकदा तरुणीवर बालात्कार केल्याची माहिती पोलिसांच्या सुत्रांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी एकजण हा या तरुणीचा कॉलेजमधीलच सहकारी आणि प्रियकर असल्याचं समोर आलं आहे.


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कटकचे पोलीस उपायुक्त जगमोहन मीना यांनी, या प्रकरणासंदर्भात 4 नोव्हेंबर रोजी कटकमधील एका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात लैंगिक अत्याच्राच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याचप्रमाणे दमकावण्याबरोबरच एससी एसटी संरक्षण कायदा, माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, "आरोपींपकडे पीडितेचे काही व्हिडीओ होतो. या व्हिडीओंच्या मदतीने ते तिला ब्लॅकमेल करु लागले. दोन वेगवेगळ्या तारखांना दोन वेगवेगळ्या आरोपींनी या तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. अन्य दोन व्यक्तींनी तिला धमकावलं," असं मीना यांनी शुक्रवारी सांगितलं. पोलिसांनी सहा आरोपींना वेगवेगळ्या तारखांना अटक केली. पोलिसांनी त्यांचे मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. हे मोबाईल फोन स्टेट फॉरेन्सिक सायन्स लेबॉरेट्रीमध्ये पुढील तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. या मोबाईलमधील तो व्हिडीओ पुढे फॉरवर्ड होऊ नये म्हणून तो तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.


वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली होती


पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता तिच्या प्रियकराबरोबर कटकमधील एका कॅफेमध्ये गेली होती. पाडितेचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी हे दोघे या कॅफेमध्ये गेले होते. त्यावेळी या कॅफेच्या मालकाने या दोघांमधील काही खासगी क्षण चोरुन आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं. 


अनेकदा बलात्कार केला


आरोपीने हे व्हिडीओ दाखवून या तरुणीवर अनेकदा बलात्कार केला. या तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी विशेष तुकडी तयार करुन या प्रकरणाचा तपास करत तातडीने आरोपींना ताब्यात घेतल्याचं पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं वृत्त 'द इंडियन एक्सप्रेस'ने दिलं आहे. मात्र कटकमधील काँग्रसचे आमदार सोफिया फिरोद यांनी या प्रकरणात तक्रार दाखल करुन घेण्यात मुद्दाम दिरंगाई करण्यात आल्याचा आरोप केला आहे. फिरोद यांनी पोलीस निर्देशक व्हा बी खुरानिया यांची पोलीस मुख्यालयामध्ये भेट घेऊन प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.