Historic Shiva temple in Hirpora : जम्मू-काश्मीरमध्ये  600 वर्ष जुने शिवलिंग सापडले आहे. घनदाट जंगलात लुप्त झालेल्या शिवमंदिराचे अवशेष पाहून संशोधक अचंबित झाले आहेत. या प्राचीन शोधामुळे परिसराला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील हिरपोरा गावातील घनदाट जंगलात प्राचीन शिव मंदिराचे अवशेष सापडले आहेत.  सर्व प्रथम  हे अवशेष स्थानिकांच्या निदर्शानास आले. स्थानिकांनी तात्काळ पुरातत्व विभागाला याची माहिती दिली. यानंतर पुरातत्व विभागाचे अधिकारी घटनास्थळी घटनास्थळी दाखल झाले.   पुरातत्व विभागाच्या पथकाने घटनास्थळी संशोधन सुरु केले आहे. 


मंदिराचे हे अवशेष 600 वर्ष जुने असल्याचे समजते. जंगलात मंदिराच्या आकाराची वास्तू सापडली आहे. यामध्ये शिवलिंग आढळून आले आहेत. हे मंदिर ललितादित्य म्हणजेच राजा अवंतीवर्मा यांच्या कालखंडाशी निगडीत असल्याचे समजते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पातुलपाल म्हणून ओखळले जायचे. हे ठिकाण ऐतिहासिक ठिकाण म्हणून जतन करावे अशी मागणी स्थानिक करत आहेत. या ठिकाणाला धार्मिक स्थळ म्हणून जतन करावे. यामुळे येथील पर्यटन वाढीला चालना मिळेल अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे. 


जम्मू-काश्मीर पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून ओळखले जाते. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होत आहे. पर्यटक येथे बर्फवृष्टीचा आनंद घेत आहेत.