दिल्ली : दिल्लीच्या संगम विहार परिसरातील ६२ वर्षीय लेडी डॉनला अटक करण्यात आलीय. बशीरन उर्फ मम्मी असं नाव असलेली ही लेडी डॉन गेल्या ८ महिन्यांपासून फरार होती. बशीरनचा स्वतःचाही या गुन्ह्यात सहभाग होताच शिवाय ती आपल्या आठ मुलांकडूनही गुन्हे करवून घेत असे.


११३ गंभीर गुन्हे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 लेडी डॉन बशीरन आणि तिच्या कुटुंबीयांवर तब्बल ११३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यांत हत्या, हत्येचा प्रयत्न करणे अशा गंभीर गुन्ह्याचा समावेश आहे. बशीरनने स्वतःच्या मुलांना गुन्हेगारीच्या दुनियेत आणलं. तसंच परिसरातील इतर लहान मुलांना ड्रग्सचं व्यसन लावून गुन्हेगारीच्या जगतात ढकलत असे.


हत्या करून फरार 


जानेवारी महिन्यात बशीरननं एका मुलाचं अपहरण करुन त्याची हत्या करण्याची योजना आखली होती. मात्र सुदैवाने त्यावेळी पोलीस तिथे पोहचले आणि तो मुलगा बचावला. तेव्हापासूनच बशीरनभोवतीचा फास आवळण्यास सुरुवात झाली होती. १७ सप्टेंबर २०१७ रोजी मिराज नावाच्या मुलाची जंगलात हत्या करुन तिनं त्याला दफन केलं होतं. तेव्हापासूनच ती फरार होती.