62 Years Old Man Became Father Of Triplet: ६२ वर्षांचा वृद्ध व्यक्ती एकाचवेळी तीन मुलांचा बाप मनला आहे. वृद्धाच्या दुसऱ्या पत्नीने एकाच वेळी तीन मुलांना जन्म दिला आहे. ही त्याची दुसरी पत्नी असून वृद्धाच्या पहिल्या पत्नीनेच त्याचे दुसरे लग्न लावून दिले होते. आता त्या दोघांनाही एकाच वेळी तीन मुलं झाली आहेत. त्यामुळं कुटुंबात आनंद पसरला आहे. गोविंद कुशवाह असं त्याचे नाव असून त्यांचे वय ६२ वर्ष आहे. तर, त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव हीराबाई असून त्यांचे वय ४२ वर्ष आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यप्रदेशमधील उचेहरा विकासखंड येथे राहणाऱ्या गोविंद यांनी 11 वर्षांपूर्वी अपघातात त्यांचा मुलगा गमावला होता. तरुण मुलाच्या मृत्यूनंतर त्यांची पहिली पत्नी कस्तूरीबाई यांच्यावर गंभीर परिणाम झाला होता. एकुलता एक मुलगा गेल्याने दोघांनाही सतत काळजी जाणवत होती. आपलं दुखः कमी करण्यासाठी त्यांनी दुसऱ्या बाळाचा विचार केला. 


दुसऱ्या बाळासाठी त्यांनी अनेक प्रतत्न केले. अनेक डॉक्टरांना भेटले पण त्यांनी सांगितले की कस्तुरीबाई आता आई होऊ शकणार नाहीत. हे ऐकून दोघंही निराश झाले. त्यानंतर कस्तुरी यांनी गोविंद यांना दुसरं लग्न करण्यासं सांगितले. सुरुवातीला ते दुसऱ्या लग्नासाठी तयारच नव्हते. मात्र, कस्तुरी यांनी त्यांची मनधरणी करत त्यांना दुसऱ्या लग्नासाठी राजी केले. 


कस्तुरीबाई यांनीच त्यांच्या दुसऱ्या लग्नासाठी मुलगी शोधण्यास सुरुवात केली. अखेर त्यांचा शोध पूर्ण झाला कंचनपूर येथे राहणाऱ्या हिराबाईसोबत त्यांनी गोविंद यांचे लग्न करुन देण्याचा निर्णय घेतला. ९ वर्षांपूर्वी पशुपतिनाथ मंदिरात दोघांचे हिंदु रिती-रिवाजानुसार लग्न लावून देण्यात आले. हिराबाई यांच्या पहिले पतीचे निधन झाले आहे. 


हिराबाई यांनी मंगळवारी सकाळी सहा वाजता तीन मुलांना जन्म दिला. सध्या तिन्ही मुलं प्रीमॅच्युअर आहेत. एकाचे वजन १२८ ग्रॅम, दुसऱ्याचे वजन २७२ ग्रॅम आणि तिसऱ्या बाळाचे वजन ३१२ ग्रॅम आहे. सध्या तिन्ही बाळांना एसएनसीयूमध्ये ठेवण्यात आले असून त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. 


एकाच वेळी तिन मुलांचे वडिल झालेले गोविंद या बातमीने खुश आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, याआधी मला एक मुलगा होता. तो १८ वर्षांचा असता त्याचा अपघाती मृत्यू झाला. आम्ही त्याला गमावले. तेव्हा माझ्या पहिल्या पत्नीने माझं दुसरं लग्न लावलं. आज सहा वर्षांनंतर मी एकत्रच तिन मुलांचा बाप झालो आहे. सध्या माझी तिन्ही मुलं ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. ते लवकरच स्वस्थ होतील अशी मला आशा आहे.