नवी दिल्ली : देशात अनेक सक्तीचे नियम लागू केल्यानंतर देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याचं चित्र समोर येत आहे,. गेल्या २४ तासांमध्ये देशात ६३ हजार ४८९ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्याचप्रमाणे ९४४ रुग्णांचा या धोकादायक विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. मात्र, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.१७ टक्क्यांवर आले असून मृत्यूदर १.९५ टक्क्यांवर आला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाच्या विळख्यातून बाहर येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २५ लाख ८९ हजार ६८२ इतकी झाली आहे. त्यापैकी ६ लाख ७७ हजार ४४४ रुग्णांवर उपचार सुरू  आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १८ लाख ६२ हजार २५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ४९ हजार ९८० रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 



देशात आतापर्यंत २,९३,०९,७०३ चाचण्या करण्यात आल्या आहेत . त्यापैकी ७ लाख ४६ हजार ६०८ चाचण्या शनिवारी करण्यात आल्या. अशी माहिती  भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने  (ICMR) दिली आहे.