कैथल (हरियाणा) : हरियाणातील कैथल नामक गावात सध्या एकच चर्चा सुरू आहे. ६५ वर्षीय विदेशी महिला आणि तिचे गावातील २८ वर्षीय मजूरावर बसलेले प्रेम. दोघेही एकमेकांना पूर्ण अनोळखी. पण, फेसबुक दोघांमधला प्रेमदूत ठरला. फेसबुकच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. ही ओळख पुढे मैत्रीत बदलली. पण, याच मैत्रीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले आणि प्रकरण विवाहापर्यंत पोहोचले. फेसबुक चॅटींग करता करता सुरू झालेला हा सिलसिला अखेर २१ जूनला रीरिरिवाजानुसार लग्न होऊनच थांबला.


मुलगा करतो मजूरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कैथल जिल्ह्यातील प्रवीण (वय २८) मोलमजूरी करतो. तर, त्याची ६५ वर्षीय पत्नी लिलियम कॅरन ही अमेरिकेची. २०१७मध्ये फेसबुकच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. पुढे चॅटींग सुरू झाले. त्यानंतर प्रकरण व्हिडिओ कॉलपर्यंत आले. दोघेही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बोलू लागले. काही दिवस अशा पद्धतीने संपर्क झाल्यावर ८ महिन्यांनी त्यांनी लग्नच करण्याचा निर्णय घेतला. २१ जून २०१८ला प्रवीण आणि लिलियम यांनी शिख रीतिरिवाजानुसार लग्न केले. 


विमानतळाजवळ पोहोचण्यासाठीही नाव्हते पैसे


प्रवीणने सांगितले की, २१ जूनला लिलियमचा वाढदिवस होता. म्हणूनच आम्ही तिच्या वाढदिवसादिवशी विवाह करण्याचा मुहूर्त ठरवला. प्रवीणने एमए केले आहे. पण, नोकरी मिळत नसल्याने तो मजुरी करतो. त्याचे आईवडीलही मजूरीच करतात. त्याने सांगितले की, लिलीयमशी जेव्हा बोलणे झाले आणि आमचे लग्न करायचे ठरले. तेव्हा मी तिला सांगितले की, माझ्याजवळ एअरपोर्टपर्यंत येण्यासाठीही पैसे नाहीत. त्यानंतर ती स्वत:च माझ्या गावी आली. लग्नापूर्वी मी माझी गरीबी आणि गरीब फॅमेलिबद्दल माहिती सांगितली होती. मी तिला हेदेखील सांगितले होते की, मी आणि माझे कुटुंब अगदीच छोट्या घरात राहतो. 


दरम्यान, दुसऱ्या बाजूला लिलियमनेही प्रवीणला सांगितले होते की, एका अपघातात तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे आणि ती आयुष्यभर आई बनू शकत नाही.