मुंबई : फोर्ब्सनं भारतातल्या सर्वाधिक संपत्ती असणाऱ्या १०० जणांची यादी प्रसिद्ध केली आहे. १०० जणांच्या या यादीमध्ये सात महिला आहेत. ओपी जिंदल समुहाच्या सावित्री जिंदल आणि बायोटेक्नोलॉजी क्षेत्रातल्या किरण मुजुमदार-शॉ यांचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोर्ब्सच्या यादीमध्ये सावित्री जिंदल आणि परिवार ७.५ अरब डॉलर एवढ्या संपत्तीसह १६व्या क्रमांकावर आहे. तर ल्यूपिनचा गुप्ता परिवार ३.४५ अरब डॉलर संपत्तीसह ४०व्या क्रमांकावर आहे. ल्यूपिनच्या गैर-कार्यकारी अध्यक्ष मंजू देश बंधू गुप्ता आहेत. हॅवल्स इंडियाचे विनोद राय गुप्ता आणि परिवार ३.११ अरब डॉलर संपत्तीसह ४८ व्या क्रमांकावर आहेत.


बेनेट, कोलमॅन आणि कंपनीच्या इंदू जैन यांची संपत्ती ३ अरब डॉलर आहे. इंदू जैन या यादीमध्ये ५१ व्या क्रमांकावर आहेत. यूएसव्ही इंडियाच्या लीना तिवारींची संपत्ती २.१९ अरब डॉलर आहे. या क्रमवारीमध्ये त्या ७१ व्या क्रमांकावर आहेत. बायोकॉनच्या किरण मुजुमदार-शॉ सर्वाधिक संपत्ती असणाऱ्या भारतीयांच्या यादीमझ्ये ७२व्या क्रमांकावर आहेत. शॉ यांच्याकडे २.१६ अरब डॉलर एवढी संपत्ती आहे.