नवी दिल्ली : दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन नागरिकांकडून सोनं जप्त केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जप्त केलेल्या सोन्याची किंमत तब्बल ७० लाख रुपये आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांमध्ये एक ४६ वर्षीय इसमाचा समावेश आहे. या व्यक्तीने ४०० ग्रॅम सोनं आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून ठेवलं होतं.


सीमा शुल्क विभागाने गेल्या तीन दिवसांत तस्करीच्या तीन प्रकरण दाखल केली आहेत. पहिला गुन्हा शुक्रवारी दाखल करण्यात आला ज्यावेळी लंडनमधून भारतात दाखल झालेल्या व्यक्तीला पकडण्यात आलं.


सीमा शुल्क विभागाने सांगितले की, सामानाची तपासणी करताना १.०९ किलोग्रॅम सोन्याचे ११८ पाकिट्स जप्त करण्यात आले. यावेळी अटक करण्यात आलेल्या तीन नागरिकांपैकी ४६ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.


इतर प्रकरणांत सीमा शुल्क विभागाने ४५ वर्षीय व्यक्तीला सोन्याच्या तस्करीत प्रकरणात अटक केली. या आरोपीने ७५२ किलोग्रॅम सोनं आपल्या पँटमध्ये लपवलं होतं. या सोन्याची किंमत २१.९९ लाख रुपये आहे.


तर, आणखीन एका प्रकरणात लंडनला जाणाऱ्या वरिष्ठ नागरिकाची तपासणी केली असता त्याच्याकडे ६०० ग्रॅम सोनं सापडलं. या सोन्याची तस्करी केली जात होती. हे सोनं तब्बल १८ लाख रुपये किंमतीचं होतं.