मुंबई : 7th Pay Commission Latest News Today:केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने 1 जुलैपासून 28 टक्के महागाई भत्ता देण्याच्या बातमीनंतर केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे.  सरकारच्या कर्मचाऱ्यांची मंथली बेसिक सॅलरी (Basic Pay)वाढवण्यावर विचार केला जात असल्याचे वृत्त होते. मात्र, केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मासिक मूलभूत वेतन वाढवण्यावर विचार करण्यास सरकारने नकार दिला आहे. सरकारकडून याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे आता मूळ पगारात कोणतीही वाढ करण्यात येणार नाही.


सरकारने हे सांगितले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

28 जुलै रोजी राज्यसभेत वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना सांगितले की, केंद्र सरकार अशा कोणत्याही योजनेचा विचार करत नाही.  7 व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे सुधारित वेतन रचनेत वेतन निश्चित करण्याच्या हेतूने 2.57 चा फिटमेंट फॅक्टर सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी एकसारखाच लागू करण्यात आला.


मासिक मूळ वेतन वाढवण्याचा विचार 


अर्थ राज्यमंत्री संसदेत एका प्रश्नाला उत्तर देत होते. यामध्ये, एक प्रश्न विचारण्यात आला होता की, केंद्र सरकार 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारावर फिटमेंट फॅक्टरनुसार महागाई भत्ता आणि महागाई दिलासा पूर्ववत झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे मासिक मूलभूत वेतन वाढवण्याचा विचार करत आहे का?


वाढलेला पगार सप्टेंबरमध्ये येणार


मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 17 टक्के डीए मिळत आहे. पण, 1 जुलै 2021 पासून ते वाढवून 28 टक्के करण्यात आले आहे. हा महागाई भत्ता सप्टेंबर महिन्याच्या पगारामध्ये येईल. जानेवारी 2020 मध्ये डीए 4 टक्क्यांनी, नंतर जून 2020 मध्ये 3 टक्क्यांनी आणि जानेवारी 2021 मध्ये 4 टक्क्यांनी वाढवण्यात आला. आता हे तीन हप्ते भरावे लागतील. परंतु, कर्मचारी अजूनही जून 2021 च्या महागाई भत्त्याच्या डेटाची वाट पाहत आहेत. हा डेटा लवकरच जारी केला जाऊ शकतो. AICPI च्या आकडेवारीनुसार7th Pay Commissionच्या अंतर्गत जून 2021 मध्ये महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होणार आहे. असे झाल्यास एकूण डीए 31 टक्के होईल. 31 टक्के सप्टेंबरच्या पगारासह दिले जाईल.


DA सह HRA देखील वाढला


एवढेच नव्हे तर महागाई भत्ता वाढवण्याबरोबरच केंद्रीय कर्मचाऱ्यांचे घरभाडे भत्ता (एचआरए) वाढवण्याचे आदेशही सरकारने दिले आहेत. नियमांनुसार, HRA वाढवण्यात आले आहे कारण, महागाई भत्ता 25 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे केंद्र सरकारने घर भाडे भत्ताही 27 टक्के केला आहे. खरं तर, खर्च विभागाने 7 जुलै 2017 रोजी एक आदेश जारी केला होता ज्यात असे म्हटले होते की जेव्हा महागाई भत्ता 25 टक्कांपेक्षा जास्त असेल. त्यामुळे घर HRA सुधारित केला जाईल. 1 जुलैपासून महागाई भत्ता 28 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, त्यामुळे HRA मध्ये देखील सुधारणा करणे आवश्यक आहे.