मुंबई : केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जुलैपासून 28 टक्के महागाई भत्ता (7th Pay Commission latest news)  मिळणार असल्याची गूड न्यूज मिळाली. यानंतर आता सरकारने या कर्मचाऱ्यांना झटका दिलाय. कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातील बेसिकमध्ये (Basic Salary) कुठल्याही प्रकारे वाढ करण्यात येणार असल्याचा कोणताही विचार नाही, असं सरकारने स्पष्ट केलंय. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजीचं वातावरण आहे. (7th Pay Commission central government denied to increase Basic Pay in government employees)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेसिक पगारात वाढ करण्याबाबत विचार नाही : सरकार


"केंद्र सरकार अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेचा विचार करत नाहीये", असं  राज्यसभेत वित्त राज्यमंत्री पंकज  चौधरी (Pankaj Chaudhary)  लेखी प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. "2.57 चं फिटमेंट फॅक्टर सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी एकाचप्रकारे फक्त 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशीच्या आधारावर रिवाइज्ड स्ट्रक्चरमध्ये वेतन निर्धारणच्या उद्देशाने लागू केलं होतं", असंही चौधरींनी स्पष्ट केलं.


प्रश्न काय होता? 


केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशीच्या आधारावर आणि फिटमेंट फॅक्टर अनुसार महागाई भत्त्यानंतर केंद्र कर्मचाऱ्यांना मासिक वेतनातील बेसिकमध्ये वाढ करण्याबाबत विचार करतेय का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर चौधरी उत्तर देत होते. 


सप्टेंबरपासून थकबाकी मिळणार


केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 17 टक्के DA दिला जातोय. या DA मध्ये 1 जुलैपासून  11 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना DA एकूण 28 टक्के मिळणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या पगारात हा वाढीव महागाई भत्ता येणार आहे. जानेवारी 2020 मध्ये DA मध्ये  4 तर त्यानंतर जून 2020 मध्ये 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. तसेच पुन्हा जानेवारी 2021 मध्ये 4 टक्क्यांनी वाढ केली गेली.


आता कर्मचाऱ्यांना या एकूण 3 हफ्त्यांची थकबाकी मिळायची आहे. पण कर्मचाऱ्यांना जून 2021 च्या महागाई भत्त्याच्या डेटाचीही प्रतिक्षा आहे. हा डेटा लवकरात लवकर जारी केला जाऊ शकतो. AICPI नुसार, 7th Pay Commission नुसार जून 2021 च्या महागाई भत्त्यामध्ये 3 टक्क्यांनी वाढ करण्यात येणार आहे. जर असं झालं, तर एकूण DA हा 31 टक्के इतका होईल. या एकूण 31 टक्क्यांची थकबाकी सप्टेंबरच्या महिन्यात मिळेल.