7th Pay Commission | जुलैमध्ये वाढणार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता; पगारात इतक्या रुपयांची भरघोस वाढ
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा सरकारने मार्चमध्ये केली होती. सरकारने 1 जानेवारीपासून महागाई भत्ता वाढवण्याबाबत म्हटले होते. एप्रिल महिन्याच्या पगारासह तीन महिन्यांची थकबाकी देण्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले होते.
मुंबई : 7th Pay Commission Latest Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा सरकारने मार्चमध्ये केली होती. सरकारने 1 जानेवारीपासून महागाई भत्ता वाढवण्यात येणार असल्याचे म्हटले होते. एप्रिल महिन्याच्या पगारासह तीन महिन्यांची थकबाकी देण्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले होते. आता जुलैमध्ये पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
4% पर्यंत वाढ
मार्चमध्ये आलेल्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) वरून हे स्पष्ट झाले आहे की जुलै-ऑगस्टमध्ये महागाई भत्ता 4% दराने वाढू शकतो.
तीन महिन्यांचा डेटा येणे बाकी
जुलै-ऑगस्टमध्ये डीएमध्ये 4 टक्के वाढ झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून ३८ टक्के होईल. एप्रिल, मे आणि एप्रिलचे आकडे येणे बाकी असले तरी वाढती महागाई पाहता AICPIचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
DA 38 टक्के असल्यास पगार किती असेल?
56,900 रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना 38% महागाई भत्त्यापोटी 21,622 रुपये DA म्हणून मिळतील. 34 टक्के डीएनुसार या कर्मचाऱ्यांना 19333 रुपये महागाई भत्ता मिळत आहे. यानुसार त्याचा पगार दर महिन्याला 2,276 रुपयांनी (वार्षिक 27,312 रुपये) वाढेल.
किमान वेतनात वाढ
18 हजार मूळ वेतन असलेल्यांना सध्या 6,120 रुपये DA मिळत आहे. जर DA 38% असेल तर तो 6840 रुपये होईल. म्हणजेच दर महिन्याला पगार 720 रुपयांनी वाढणार आहे. त्यानुसार वार्षिक 8,640 रुपयांची वाढ होणार आहे.