7th Pay Commission DA Hike January 2025: 2024 वर्ष शेवटाकडे आले आहे. या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्याबद्दल आपण विविध चर्चा ऐकल्या असतील. पण येणारे 2025 गे वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन येत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. महागाई भत्त्यात पुन्हा एकदा वाढ केली जाईल शक्यता आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार? जाणून घेऊया.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए वाढ) केवळ 3 टक्क्यांनी वाढ होईल. सध्याचे ट्रेंड पाहिले तर महागाई भत्ता (जानेवारी 2025 DA) 56 टक्क्यांवर पोहोचेल. आपण यामागची आकडेमोड समजून घएऊया. आता AICPI निर्देशांकाचे ऑक्टोबरपर्यंतचे आकडे आले आहेत. पमृण नोव्हेंबर आणि डिसेंबरमधील कल पाहिल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केवळ 3 टक्के वाढ दिसून येते. AICPI निर्देशांक देशातील महागाई आणि वस्तूंच्या किमतीतील बदलांचा मागोवा घेत असतो. आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2024  या सहामाईचे आकडे जाहीर करण्यात आले आहेत. AICPI निर्देशांकनुसार, जुलैमध्ये हा आकडा 142.7 अंकांवर होता. ज्यामुळे महागाई भत्त्याचा स्कोअर 53.64 टक्क्यांवर पोहोचला. ऑगस्टमध्ये निर्देशांक 142.6 अंक आणि DA 53.95% वर पोहोचला. सप्टेंबरमध्ये 143.3 अंकांच्या तुलनेत, भत्ता स्कोअर 54.49% होता. त्याच वेळी, ऑक्टोबरच्या ताज्या आकडेवारीनुसार, निर्देशांक 144.5 अंकांवर पोहोचला आहे. महागाई भत्ता 55.05 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्याचा महागाई भत्ता दर 53 टक्के आहे, जो जुलै 2024 पासून लागू आहे.


1 जानेवारीपासून नवीन डीए 


केंद्र सरकार दर 6 महिन्यांनी डीएमध्ये सुधारणा करते. जुलै 2024 मध्ये 3% वाढ झाल्यानंतर आता जानेवारी 2025 मध्ये 3% ची केली जाण्याची शक्यता आहे. 1 कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन महागाई भत्ता जानेवारी 2025 पासून लागू होईल. असे असताना मार्च 2025 मध्ये त्याची घोषणा होणे अपेक्षित आहे. सर्वसाधारणपणे सरकारकडून मार्चमध्ये होळीच्या आसपास याची घोषणा केली जाते.


नोव्हेंबर-डिसेंबरचा ट्रेंड काय?


ऑक्टोबरपर्यंत निर्देशांक 144.5 अंकांवर आहे. ज्यामुळे महागाई भत्ता 55.05% झाला आहे. पुढील दोन महिन्यांचा कल पाहिल्यास, नोव्हेंबरमध्ये निर्देशांक 145 अंकांवर पोहोचू शकतो, ज्यामुळे महागाई भत्ता 55.59% पर्यंत पोहोचेल. असे असताना डिसेंबरमध्ये निर्देशांक 145.3 अंकांवर पोहोचण्याची शक्यता आहे. ज्यामुळे महागाई भत्त्यात चांगली उसळी पाहायला मिळेल. म्हणजेच तो 56.18% पर्यंत पोहोचेल. त्यामुळे एकूण महागाई भत्त्यात केवळ 3 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.


पगारात कितीने होईल वाढ?


7 व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात कितीने वाढ होईल? समजून घेऊया. किमान मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना वार्षिक 6 हजार 480 अधिक मिळतील. उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18 हजार इतके असेल आणि महागाई भत्ता 56% असेल, तर त्याचे कॅल्क्युलेशन पुढील प्रमाणे असेल. 


जानेवारी 2025 पासून महागाई भत्ता 18 हजार रुपये x 56% = 10 हजार 080 रुपये महिना
जुलै 2024 पासून महागाई भत्ता : 18 हजार रुपये x 53% = 9 हजार 540 रुपये महिना
3% वाढीनंतरचा फरक: 540 रुपये प्रति महिना


(Desclaimer: वर दिलेली पगाराची गणना केवळ अंदाजाच्या आधारावर आहे. इतर भत्ते आणि फिटमेंट फॅक्टर जोडल्यामुळे मूळ पगार मोठ्या प्रमाणात बदलू शकतो. येथे केवळ महागाई भत्त्यातील फरक दाखवण्यात आला आहे.)