7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात या महिन्यापासून मोठी वाढ; PF ची रक्कमही वाढणार
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे DA लवकरच मिळणार आहेत.
नवी दिल्ली : लाखो कर्मचारी आणि पेन्शनर्स आपल्या महागाई भत्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. येत्या जुलै महिन्याच्या पगारात हे भत्ते मिळतील अशी अपेक्षा आहे. हा भत्ता 7व्या वेतन आयोगानुसार जानेवारीच्या अहवालाप्रमाणे असणार आहे. त्यामुळे जुलैमध्ये महागाई भत्ता मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात जूनच्या आधी हा भत्ता मिळण्याची शक्यता कमी आहे.
PF चे बदलतील नियम?
केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचा डीए (DA) जून 2021 पर्यंत स्थगित केला आहे. केंद्र सरकारने म्हटले आहे की, महागाई भत्त्याची देय 1 जुलैपासून देण्यात येईल. डीएचे तीन हफ्ते थांबले आहेत. जानेवारी 2020 ते जून 2020, जूलै 2020 ते डिसेंबर 2020, आणि जानेवारी2021 ते जून 2021 दरम्यानचे डीए जुलैच्या पगारात जोडण्यात येणार आहे.
बेसिक सॅलरी आणि डीए मिळून प्रोव्हिडंट फंड (PF) जमा केला जातो. आता डीए वाढणार असेल PF ची रक्कमही वाढू शकते. ज्याचा फायदा कर्मचाऱ्यांना भविष्यात होणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 17 टक्के दराने डीए आणि डीआर मिळतो. तो वाढून 28 टक्के होण्याची शक्यता आहे.
DA वाढल्याने लाभ होणार
गेल्या महिन्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्य सभेत लिखित उत्तरात म्हटले होते की, 1 जुलैपासून केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना DA चा फायदा होईल. आतापर्यंत थकलेले सर्व डीए तेव्हा देण्यात येतील आणि त्यात होणाऱ्या वाढीचाही कर्मचाऱ्यांना लाभ होईल.
केंद्र सरकारने काही दिवस आधीच सरकारी पेन्शनधारकांना फॅमिली पेन्शनची कमाल सीमा वाढवण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारने फॅमिली पेन्शनमध्ये अडीच टक्क्यांची वाढ केली आहे. फॅमिली पेन्शनची कमाल सीमा 45000 रुपये प्रति महिना आहे. ती आता 1.25 लाख रुपये प्रति महिना करण्यात आली आहे.