मुंबई : आठवड्यातील केवळ 4 दिवस (4 days week) केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये (central government offices) काम करण्याचे कोणतेही नवीन नियम लागू होणार नाहीत. केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी संसदेत, असा कोणताही प्रस्ताव सरकारच्या अजेंड्यात समाविष्ट नसल्याची लेखी माहिती दिली आहे.


कामगार मंत्र्यांकडून अफवांचे खंडण (Labor minister denied the rumors)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी संसदेला दिलेल्या माहितीत हे स्पष्ट केले आहे की, आठवड्यातून 4 दिवस किंवा आठवड्यात 40 तास  काम करण्याच्या कोणत्याही प्रस्तावावर सरकार विचार करत नाही. याचा अर्थ केंद्रीय कर्मचारी पूर्वीप्रमाणेच काम करत राहतील. त्यांची साप्ताहिक सुट्टी किंवा त्यांचे कामाचे तास बदलणार नाहीत.


पूर्वीच्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचार्‍यांना साप्ताहिक रजा आणि कामाचे तास निश्चित केले गेले आहेत आणि ते नियम असेच चालू राहतील. सरकारच्या या माहितीमुळे केंद्रीय कर्मचार्‍यांना कदाचित थोडासा त्रास झाला असावा.


नक्की नियम काय?


चौथ्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या (Fourth Pay Commission) आधारावर सध्या केंद्रीय कर्मचार्‍यांचे कामकाजाचे तास व सुट्टी निश्चित आहेत. सातव्या वेतन आयोगात (7th pay Commission) त्याच शिफारसी पुढे आणल्या गेल्या आहेत. त्यानुसार आता केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना (central government employees) आठवड्यातून 5 दिवस आणि दररोज 08.30 तास काम करावे लागेल. अशा प्रकारे 5 दिवसात एकूण 42.30 तास काम करावे लागेल. कामकाजाचे तास कमी करता येईल, अशी  होती पण सध्या केंन्द्र सरकार या अजेंड्यावर काही काम करत नाही आहे.