7th Pay Commission: क्या बात! 52 लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
एक मसुदा तयार करण्यात येणार असून, तो शासनाकडे सोपवण्यातही येणार आहे.
7th Pay Commission Fitment Factor update: केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी नुकतीच पाहायला मिळत आहे. कारण येत्या काळात सरकार फिटमेंट फॅक्टरसंदर्भात मोठा निर्णय घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. यामुळं शासकीय कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात वाढ होणार आहे. यासाठी एक मसुदा तयार करण्यात येणार असून, तो शासनाकडे सोपवण्यातही येणार आहे.
मसुदा तयार करण्यात आल्यानंतर जुलै महिन्यात यासंदर्भातील बैठक होणार आहे. सदर प्रकरणी केंद्रानं सहमती दर्शवल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात फिटमेंट फॅक्टर अंतर्गत वाढ होणार आहे.
घसघशीत पगारवाढ
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 1 जुलै 2022 पासून नवा महागाई भत्ता लागू होणार आहे. AICPI च्या आकड्यानुसार 1 जुलैपासून महागाई भत्ता 4 ते 5 टक्क्यांनी वाढणार आहे. म्हणजेच 38 ते 39 टक्के इतका डीए असणार आहे.
किती फरकानं वाढणार पगार?
6th CPC Pay Band: PB 1
ग्रेड-पे: 1800 रुपये
Current Entry Pay: 7000 रुपये
7th Pay Commission अंतर्गत फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास Entry Pay: 7000 x 2.57 = 18,000 रुपये.
Fitment Factor 3 झाल्यास काय होणार?
6th CPC Pay Band: PB 1
ग्रेड-पे: 1800 रुपए
Current Entry Pay: 7000 रुपये
7th Pay Commission अंतर्गत फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास Entry Pay: 7000 x 3 = 21,000 रुपये.