७ वी च्या विद्यार्थ्याची शिक्षिकेला बलात्काराची धमकी....
गुडगाव येथील एका नामांकित शाळेत सातवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थ्याने सोशल मीडिया साईट फेसबुकवर एक पोस्ट केली.
गुडगाव : गुडगाव येथील एका नामांकित शाळेत सातवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थ्याने सोशल मीडिया साईट फेसबुकवर एक पोस्ट केली. त्यात त्याने शिक्षिकेला आणि तिच्या मुलीला बलात्कार करण्याची धमकी दिली आहे. यामुळे शाळेचे प्रशासन त्रस्त आहे. ही एकच घटना नसून यापूर्वी ही एका विद्यार्थ्याने शिक्षिकेला मेल करून कॅंडल लाईट डेट आणि सेक्ससाठी विचारले होते. या दोन्हीही घटना गेल्या आठवड्यातीलच आहेत.
शिक्षिका आणि तिच्या मुलीली मोठा धक्का
या गंभीर पोस्टमुळे शिक्षिका, तिची मुलगी आणि त्यांचे कुटुंबिय चिंतेत आहेत. शिक्षिकेच्या मुलीली शाळेत जाण्यास घरातले मनाई करत आहेत. कारण शिक्षिकेची मुलगी आरोपी विद्यार्थ्याच्या वर्गातच शिकते. या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हा बाल कल्याण समितीने शाळेला नोटीस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मुलांचे, शाळेतील प्रशासनाचे काऊंसिंलिंग करण्याचा विचार समिती करत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेतील अधिकारी, शिक्षकांच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा तपास केला जात आहे.
जिल्हा बाल कल्याण समितीचा निर्णय
जिल्हा बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा शकुंतला धुल यांनी सांगितले की, या घटनेची दखल घेण्यात येईल. शाळा आणि आरोपी विद्यार्थ्याला नोटीस पाठवण्यात येईल. त्यांची चौकशी करण्यात येईल. शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी काऊंन्सिलिंगचे आयोजन करण्यात येईल.
या प्रकरणी गुडगाव पोलीसांच्या पीआरओ रविंद्र कुमार यांनी सांगितले की, आम्हाला या प्रकरणाची खबर लागली असली तरी अजून पीडितांकडून कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झालेली नाही.