बंगळुरू : कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यात गुरूवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये जवळपास ८ जणांचा मृत्यू झाला. दगडखाणीजवळ एका ट्रकमध्ये हा स्फोट झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. या ट्रकमधून काही जण जिलेटीनच्या काड्या घेऊन जात होते. शिवाय स्फोटाची तिव्रताही मोठी होती. त्यामुळे आजू-बाजूच्या घरांच्या काचा देखील फुटल्या आहेत. तर अनेकांना भूकंप झाला असं वाटलं त्यामुळे अनेक नागरिक आपल्या घरातून बाहेर निघाले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 याप्रकणी राज्य सरकार पीडितांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. 'या दुर्घटनेबद्दल ऐकून प्रचंड वेदना झाल्या. पीडित कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.' असं ट्वीट करत त्यांनी  शोक व्यक्त केला. 



.दरम्यान या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर शिवमोगा हा गृह जिल्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचा आहे. स्फोटकं ट्रकमध्ये होता की ट्रकच्या बाजुला याचा शोध अद्याप सुरू असल्याचं एडीजीपी प्रताप रेड्डी यांनी म्हटलंय.