नवी दिल्ली : भारतीय वायुसेना आज ८८ वा स्थापना दिवस साजरा करतेय. भारताच्या गौरवशाली इतिहासाशी कार्यक्रमाला सुरुवात झालीय. चीन आणि पाकिस्तान असं दुहेरी आव्हान घेणारी वायुसेना आपल्या कामगिरीचे प्रात्यक्षिक दाखवत आहे. या कार्यक्रमात ५६ एअरक्राफ्टनी सहभाग घेतलाय. यामध्ये राफेल, जॅगुवार, तेजस सहीत सुखोई आणि मिराजचा देखील समावेश आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टेटिक डिस्प्लेमध्ये राफेलला मध्यभागी स्थान देण्यात आलंय.फ्लाय पास्टच्या फॉर्मेशनमध्ये देखील राफेलला स्थान देण्यात आलंय.



विजय फॉर्मेशनमध्ये राफेलसोबत मिराज-२००० आणि जॅगुआर फायटर सारखे जेट्स आहेत. तर ट्रांसफॉर्मर फॉर्मेशनमध्ये तेजस आणि सुखोई विमान देखील असतील. आज आकाशातून साऱ्या जगाला राफेल आणि स्वदेशी तेजसची ताकद बघायला मिळत आहे. 



वायुसेनेने रंगीत तालमीत आपल्या शक्ती प्रदर्शनाची झलक दाखवली आहे. यावेळी सर्व फायटर ५-५ च्या फॉर्मेशनमध्ये उड्डाण भरताना दिसणार आहेत. भारतीय वायुसेनेचा पराक्रम जगाने अनेकदा पाहीलाय. आज वायुसेना स्थापना दिनानिमित्त संपूर्ण जग हा थरार पाहत आहे.




दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वायुसेना स्थापना दिनानिमित्त ट्वीट करत अभिमान व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.