8th Pay Commission: केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार बनण्याची तयारी सुरु आहे. नव्या सरकारकडून नागरिकांच्या नव्या अपेक्षा असतील. दरम्यान 8  व्या वेतन आयोगाची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर येतेय. लोकसभा निवडणूक निकालानंतर कर्मचाऱ्यांप्रती सरकारचा मूड बदलल्याचे बोलले जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवे सरकार 8 व्या वेतन आयोगासंदर्भात कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करु शकते, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आलीय. असे असले तरी ही चर्चा कधी होईल हे सांगता येत नाही. पण लवकरच यावर विचार केला जाण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षापर्यंत केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करु शकते, असे म्हटले जात आहे 


8 व्या वेतन आयोगाची तयारी 


केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीत वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून त्यांना हे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. पुढच्या वेतन आयोगाची तयारी सुरु असल्याचे म्हटले जात आहे. वेगळा वेतन आयोग आणला जाऊ शकतो, याबद्दल सरकारकडून दुजारो देण्यात आला नाही. कर्मचाऱ्यांनी सातत्याने मागणी केल्यानंतर पावसाळी अधिवेशनात यासंबंधी चर्चा होण्याची शक्यता आहे. 


..तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ


8 वा वेतन आयोग मिळाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी उसळी पाहायला मिळू शकते. नव्या वेतन आयोगामध्ये काय मिळेल? काय नाही? हे आताच सांगणे कठीण आहे. कोणते प्लानिंग कमिशन बनेल की ही जबाबदारीदेखील अर्थ मंत्रालय निभावेल? असा प्रश्नदेखील उपस्थित होतोय. 2 महिन्यात कमिटीची स्थापना केली जाऊ शकते. यानंतर कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्यासाठी फॉर्मुला ठरण्याची शक्यता आहे. 


केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 54 टक्के महागाई भत्ता, 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट


केव्हा येईल 8 वे वेतन आयोग?


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2025 पर्यंत 8 वा वेतन आयोग लागू होऊ शकतो. असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ पाहायला मिळेल. 7 व्या वेतन आयोगाच्या तुलनेत आठव्या वेतन आयोगात अनेक बदल होण्याची शक्यता आहे. 


किती वाढेल पगार?


सातव्या वेतन आयोगाप्रमाणे आठव्या वेतन आयोगात सर्वकाही ठिक चालले तर कर्मचाऱ्यांची मोठी पगारवाढ होईल. कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर वाढून 3.68 टक्क्यांनी वाढेल. फॉर्मुला काहीही असो पण कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरीमध्ये 44.44 टक्के वाढ होऊ शकते.