मुंबई : हल्ली ऑनलाईन फू़ड ऑर्डर करण्याकडे सामान्यांचा जास्त कल असतो. ऑनलाईन ऑर्डरवर मिळणाऱ्या वेगवेगळ्या ऑफर कायमच भुरळ पाडत असतात. पण असं ऑनलाईन फूड ऑर्डर करणं महागात देखील पडू शकतं हे या घटनेने समोर आले आहे. दिल्लीच्या गाझियाबादमध्ये इंजिनिअरिंग करणाऱ्या सिद्धार्थला ऑनलाईन फूड ऑर्डर करणं जास्तच महागात पडलं आहे. काठी रोल आणि एक रूमाली रोटीकरता या विद्यार्थ्याला तब्बल 91 हजार रुपये मोजावे लागले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर झालं असं की, सिद्धार्थने ऑनलाईन फूड ऑर्डर केलं. त्याचे 142 रुपये त्याने आगाऊ भरले. बराचवेळ जेवण आलं नाही म्हणून त्याने ऍपमार्फत त्यानी माहिती मागितली. तिथून जेवण डिलीवर होऊन सिद्धार्थने नाकारल्याच सांगण्यात आलं. हे ऐकल्यानंतर गोंधळलेल्या सिद्धार्थने तात्काळ कस्टमर केअरला फोन केला. मात्र फोन लागत नसल्यामुळे काहीच माहिती मिळत नव्हती. 


तेव्हा त्याला एका नंबरवरून फोन आला आणि ती व्यक्ती ऍपच्या कस्टमर केअरमधून बोलत आहे. त्यांना सिद्धार्थ पैसे परत करायचे सांगून ऑनलाईन पेमेंटचे डिटेल्स मागण्यात आले. त्यानंतर लगेचच सिद्धार्थच्या अकाऊंटमधून 91 हजार 196 रुपये काढल्याचा मॅसेज आला. 


एकूण 7 वेळा ट्रांजेक्शन झाले आणि 91 हजार 196 रुपये काढण्यात आले. हे होताच सिद्धार्थने तात्काळ पोलिसांत तक्रार केली. घडलेल्या घटनेची माहिती आपल्या पालकांना देखील दिली. पोलिसांनी तक्रार लिहून घेतली असून तपास सुरू आहे. या घटनेवरून ऑनलाईन फूड ऑर्डर करणं सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे. या अगोदरही ऑनलाईन वस्तूंमध्ये गैरव्यवहार झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत.