९ वीतील विद्यार्थींनीची आत्महत्या ; वडीलांचा शिक्षकांवर आरोप
मुलांच्या आत्महत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही.
नोएडा : मुलांच्या आत्महत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. आता पुन्हा एकदा या घटनाक्रमात अजून एक प्रकरण समोर आले आहे. शाळेत ९ वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. हा विद्यार्थींनी आपल्या कुटुंबासमवेत नोएडात राहत होती.
काय आहे हे प्रकरण?
कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मार्चला या विद्यार्थींनीचा निकाल होता. ती दोन विषयात नापास झाली असल्याने ती काहीशी तणावात होती आणि अचानक बुधवारी तिने हे टोकाचे पाऊल उचलले.
मुलाच्या मृत्यूनंतर तिच्या वडीलांनी शाळेतील दोन शिक्षकांवर गंभीर आरोप केले आहेत. या शिक्षकांनी त्याच्यासोबत छेडछाड केली असल्याचे खु्द्द मुलीने आपल्याला सांगितले असल्याचा खुलासा वडीलांनी केला. याप्रकरणी त्यांनी शाळेत तक्रारही दाखल केली होती. मात्र त्यावेळेस शाळेकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. उलट त्यामुळे एसएसटी शिक्षकांनी त्याला नापास केल्याचा आरोप मृत मुलाच्या वडीलांनी केला आहे.
हॉस्पिटलमध्ये पोहचण्यापूर्वीच मृत्यू
याप्रकरणी कैलाश हॉस्पिटलच्या डॉक्टर्सने सांगितले की, जेव्हा मुलीला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले तेव्हाच त्याचे पल्स आणि बीपी रेकॉर्ड करण्यात आले. पण ते काहीसे मंदावले होते. त्याला वाचवण्याचा डॉक्टरांनी खूप प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही.
शाळेकडून स्पष्टीकरण नाही
रिपोर्टसनुसार, ही विद्यार्थ्यींनी अभ्यासात चांगली असण्याबरोबरच एक उत्तम डान्सर होती. ती आपल्या वडीलांकडूनच नृत्याचे धडे घेत होती. आत्महत्येनंतर शवाचे पोस्टमार्टम करण्यात आले.
या प्रकरणी शाळेने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.