Doraemon : भयानक दुर्घटनेचा थरार! Doraemon कार्टूनमुळे वाचला 6 वर्षाच्या मुलाचा जीव
Doraemon कार्टूनमुळे एका लहान मुलाचा जीव वाचला आहे. इमारत कोसळताना या मुलाला Doraemon कार्टून मधील एक युक्ती आठवली. यामुळे त्याचा जीव वाचला आहे.
Doraemon Cartoon : हल्ली लहान मुलांना कार्टून पाहण्याचे वेड लागले आहे. त्यातही डोरेमॉन हा (Doraemon Cartoon) हे अनेक लहान मुलांचा आवडता कार्टून शो आहे. अनेक मुलांचे पालक डोरेमॉन मुळे त्रस्त झाले आहेत. मुलांना कार्टून पाहण्यापासून रोखण्यासाठी पालक अनेक प्रयत्न देखील करत आहे. मात्र, याच Doraemon कार्टूनमुळे लखनऊमधील (Lucknow) एका लहान मुलाचा जीव वाचला आहे. भूकंपा सारख्या आापत्कालीन स्थितीत स्वत:चा बचाव कसा करायचा हे या मुलांला Doraemon कार्टूनमुळे आठवले. यामुळे या दुर्घटेतून तो स्वत:चा बचाव करु शकला आहे.
लखनऊमध्ये भुकंपामुळे मोठी इमारत दुर्घटना घडली (lucknow building collapse) या दुर्घटनेतून मुस्तफा नावाचा सहा वर्षाचा मुलगा सुखरुप बचावला आहे. तो तो सपाचे प्रवक्ते अब्बास हैदर यांचा मुलगा आहे. या दुर्घटनेत त्याची आई उजमा आणि आजी बेगम हैदर यांचा मृत्यू झाला आहे. मुस्तफा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुस्तफासह 14 बचावलेल्या 14 जणांना उपचतारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मंगळवारी दुपारी लखनऊमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. वजीर हसन रोडवरील 5 मजली इमारत कोसळली. इमारतीत 14-15 कुटुंबे राहत होती. अनेक जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. मुस्तफासह 15 जण या दुर्घटनेतून बचावले आहेत.
मुस्तफा याने या दुर्घटेनतुन बचावल्यानंतर आपला थरारक अनुभव सांगितला आहे. भूकंपाचे हादरे बसले तेव्हा मी प्रचंड घाबरलो होतो. घरातील सर्व सदस्यांची जीव वाचवण्याची पळापळ सुरु होती. यावेळी मला Doraemon Cartoon दाखवण्यात आलेली आयडिया आठवली असे मुस्तफाने सांगितले.
Doraemon Cartoon च्या एक एपिसोडमध्ये भूकंपादरम्यान नोबिता घराच्या कोपऱ्यात किंवा पलंगाखाली आश्रय घेत होता हे दाखवण्यात आले होते. यामुळे नोबिताचा जीव वाचला. हेच मला आठवले. मी तात्काळ पलंगाखाली लपलो. मात्र, थोड्या वेळाने इमारत कोसळली आणि सर्वत्र अंधार झाला असे मुस्तफाने सांगितले. या दुर्घटनेत मुस्तफा बचावला आहे. त्याचे वडिल अब्बास हैदर हे दुर्घटना घडली तेव्हा घरी नव्हते तसेच त्याचे अमीर हैदरही थोडक्यात बचावले आहेत.