रात्री रस्त्यावर Couple करत होतं असं काम, कोणतरी गुपचूप Video काढून केला Viral
सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो.
Couple Dancing On Road: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. असाच एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. यात एक जोडपं बिनधास्तपणे रस्त्यावर डान्स करताना दिसत आहे. नृत्याच्या माध्यमातून भावना व्यक्त करता येतात, हेच व्हिडीओ पाहिल्यावर नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. कला दाखवण्यासाठी स्टेजची गरज नसल्याचं अनेकांनी सांगितलं आहे. या जोडप्याने आपले टॅलेंट दाखवण्यासाठी रस्त्यावर स्ट्रीट लाईटखाली ठेका धरला. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. दोघेही ट्रेंड डान्सरप्रमाणे नृत्य करताना दिसत आहेत.
ट्विटरवर प्रेरणा माहेश्वरी नावाच्या यूजर्सने हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. यामध्ये जोडपं रस्त्यावरील दिव्याखाली बिनधास्तपणे नाचताना दिसत आहे. कोणीतरी आपला व्हिडीओ बनवत आहे, याची देखील या दोघांना कल्पना नाही. याची त्यांना कल्पना नाही. इमारतीवरून हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. या दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र त्यांचा डान्स पाहून ट्रेंड डान्सरपेक्षा कमी नाहीत, असंच म्हणावं लागेल.
16 सेकंदांच्या या व्हिडीओला 12 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, व्हिडीओला 1500 हून अधिक रिट्विट्स आणि जवळपास 2.5 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना नेटकऱ्यांनी लिहिलं आहे की, दोघेही काही डान्स इव्हेंटचा सराव करत असल्याने तल्लीन झाले आहेत. काहीजण त्यांना जोडपे असल्याचे सांगत आहेत.