पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : देशात मोठ्या प्रमाणात शेतीतून अनेकांचा उदरनिर्वाह होता. शेती हे आता फायदेशीर व्यवसाय नाही. असा अनेकांचा समज झालाय. मात्र तसं अजिबात नाही. कारण अनेक शेतकरी फायदेशीर पिकांची लागवड करुन चांगले उत्पन्न मिळवत आहेत. त्यामुळे शेतक-यांसाठी सर्वात चांगला व्यवसाय म्हणजे बांबू व्यवसाय (Bamboo business) बांबूपासून बनवलेल्या वस्तूंनाही बाजारात चांगली मागणी आहे. अशा परिस्थितीत या झाडाची लागवड करून शेतकऱ्यांना बंपर नफा (Big profit) मिळू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांबूपासून अनेक उत्पादने तयार
बांबू या पिकासाठी शासनाकडून अनुदानही (Grant from Govt) दिले जाते. पेपर मेकर्स (Paper Makers) व्यतिरिक्त, बांबूचा वापर सेंद्रिय कपडे (Organic clothing) बनवण्यासाठी केला जातो. यासोबतच अनेक सजावटीच्या वस्तूंसाठीही बांबूचा वापर केला जातो.


लागवडीसाठी जमीन
बांबूच्या लागवडीसाठी जमीन (Land for cultivation) तयार करण्याची गरज नाही. 2 फूट खोल आणि 2 फूट रुंद खड्डा खणून तुम्ही त्याचे प्रत्यारोपण करू शकता. तसेच बांबू लागवडीच्या वेळी शेणखत (Bamboo Plantation Manure) वापरता येते. रोप लावल्यानंतर ताबडतोब पाणी द्या. आणि एक महिना दररोज पाणी द्या. सहा महिन्यांनी आठवडाभर पाणी द्यावे. अत्यंत थंडी असलेल्या ठिकाणी त्याची लागवड केली जात नाही. 


बांबूची लागवड आणि नफा
बांबूची लागवड कटिंग्ज किंवा राइझोमद्वारे (By cuttings or rhizomes) शेतात केली जाते. प्रति हेक्टर (per hectare) सुमारे 1 हजार 500 रोपे लावू शकतो. त्याचे पीक तयार होण्यासाठी 3 वर्षांचा कालावधी लागतो. त्याच वेळी, प्रति रोपासाठी ही किंमत 200 ते 250 रुपये आहे.  बांबूपासून बनवलेल्या वस्तूंना जास्त मागणी आहे. बांबूच्या काड्या (Bamboo sticks) विकून तुम्ही वर्षाला 4 ते 5 लाखांचा नफा कमवू शकता. याशिवाय तुम्ही लाकडाचा वापर करून अनेक प्रकारच्या वस्तू घरी बनवू शकता आणि विकू शकता. यामुळे तुमचा नफा अनेक पटींनी वाढेल.


बांबूपासून 40 ते 70 वर्षांपर्यंत नफा
बांबू पिकाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते 40 वर्षे टिकते. पीक घेतल्यानंतरही ते पुन्हा वाढते.चार वर्षानंतर तुम्ही त्यातून दरवर्षी नफा (profit every year) मिळवू शकता. अधिक लक्ष दिल्यास ही झाडे 70 वर्षांपर्यंत जगू शकतात.