Carry Bag @ 3000 Rupee : बऱ्याचदा अनेक कंपन्या ग्राहकांचा विचार न करता आपला निर्णय लागू करतात. मात्र, ग्रहाकांची ताकद काय असते आणि ग्राहकांना गृहित धरल्याचे काय परिणाम होवू शकतात हे बंगळुरुमधील एका महिलेने दाखवून दिले आहे.  IKEA  शोरुमने कॅरी बॅगसाठी  20 रुपये घेतले होते. या प्रकरणी महिलेने Ikea शोरुम विरोधात तक्रार दाखल केली. यानंतर ग्राहक मंचाने  IKEA  कंपनीकडून 150 पट दंड वसूल केला आहे.


काय आहे नेमकं प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संगीता बोहरा नावाच्या महिलेने या प्रकरणी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली होती.  IKEA ही स्वीडिश कंपनी आहे. संगीता बोहरा यांच्या दणक्यामुळे  IKEA ला दंड भरावा लागला आहे.  6 ऑक्टोबर 2022 रोजी संगीता बोहरा यांनी बेंगळुरु येथील IKEA स्टोअरमध्ये खरेदीसाठी आल्या होत्या. 2,428 रुपयांची खरेदी त्यांनी केली. यांनतर त्यांनी कॅरीबॅग मागितली. बिलिंग कर्मचार्‍यांनी सामानासह कंपनीचे ब्रँडिंग असलेली कॅरीबॅग देण्यासाठी 20 रुपये आकारले. यानंतर महिलेने यासंदर्भात कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. कंपनीचा लोगो ब्रँडिंगसाठी वापरत असलेल्या बॅगसाठी ग्राहकांकडून पैसे आकारले जात नाहीत असे या महिलेने बिलींग काऊंटवर असलेल्या कर्मचाऱ्यांना सांगितले. मात्र, तुम्हाला पैसे द्यावेच लागतील असे म्हणत कर्मचाऱ्यांनी या महिलेसह हुज्जत घातली. अखेरीस पिशवीचे 20 रुपये देऊन महिला शो रुममधून बाहरे पडली. 


महिलेची कंपनीविरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार


ग्राहक मंचाकडे तक्रार करण्याआधी महिलेने  Ikea ला कायदेशीर नोटीस पाठवून कॅरीबॅगसाठी शुल्क आकारण्याचे कारण विचारले होते आणि तिचे पैसे परत मागितले होते. मात्र, कंपनीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेरीस महिलेने IKEA कंपनीविरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली. 6 ऑक्टोबर 2022 रोजी  महिलेने ग्राहक मंचाकडे तक्रार केली होती. ग्राहक विवाद निवारण आयोगाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. अखेरीस महिलेच्या तक्रारीनंतर 4 ऑक्टोबर रोजी  जवळपास एका वर्षानंतर, ग्राहक मंचाने या प्रकरणावर आपला निर्णय दिला आहे. IKEA   कर्मचार्‍यांचे वर्तन चुकीचे असल्याचे  ग्राहक मंचाने म्हंटले आहे. 


IKEA कंपनीला नुसकान भरपाई देण्याचे आदेश


ग्राहक मंचाने IKEA कंपनीला नुसकान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. महिलेला न्यायालयीन खर्चासह 20 रुपयांच्या 150 पट दंड म्हणजेच 3000 रुपयांचा दंड भरण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिले आहेत.