Worlds Most Expensive Mango: ओडिशात (Odisha) एका शेतकऱ्याने जगातील सर्वात महागडा आंबा पिकवल्याचा दावा केला आहे. रक्षयकर भोई असं या शेतकऱ्याचं नाव असून, ते शिक्षकही आहेत. 'मियाझाकी' असं या आंब्याचं नाव असून, सर्वात महागडी जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या आंब्याला प्रचंड मागणी असून, वेगळी चव आणि मूल्यामुळे त्याला चांगलाच भाव आहे. हा आंबा तब्बल 2.5 ते 3 लाख रुपये किलोने विकला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, धरमगड उपविभागांतर्गत कंदुलगुडा गावचे मूळ रहिवासी असलेले आंबा शेतकरी रक्षयकर भोई आपल्या शेतजमिनीत आंब्याच्या विविध जाती वाढवत आहेत. राज्याच्या फलोत्पादन विभागामार्फत बियाणे मिळविल्यानंतर त्यांनी आपल्या बागेत 'मियाझाकी' जातीत्या आंब्याची पेरणी केली होती.


मियाझाकी ही जात मूळतः जपानी जातीचा आहे. त्याच्या विशिष्ट चव आणि औषधी मूल्यासाठी परदेशात याला प्रचंड मागणी आहे. दरम्यान मियाझाकी आंबा पाहण्यासाठी रक्षयकर भोई यांच्या शेतात लोक गर्दी करत आहेत. 



"आंब्याची ही जात दिसायला खूप रंगीबेरंगी तर आहे. पण त्यासह त्याची चवही अनोखी आहे. हा आंबा इतर जातींपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे कारण त्यात अ आणि क जीवनसत्त्वं, तसेच अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. हा आंबा शरिराचं अनेक रोगांपासून संरक्षण करतं. तसंच आरोग्यासाठी हा आंबा चांगला असल्याचं सांगितलं जातं. त्यात आहारातील फायबर, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील असते", अशी माहिती रक्षयकर भोई यांनी दिली आहे.



कालाहंडी येथील सहाय्यक फलोत्पादन संचालक टंकधर कालो यांनी सांगितलं की, या प्रकारच्या आंब्यांसाठी अधिक संशोधनाची गरज आहे. मियाझाकी याला 'रेड सन' आणि 'सूरजा दीम' या नावानेही ओळखलं जातं. सूरजा दीमचा अर्थ लाल अंडं असा होतो.