IAS Officer Story: आपल्याला आपल्या आयुष्यात अनेक प्रसंग प्रेरित करत असतात. त्यातूनच आपण पुढे घडत असतो त्याचसोबतच अशा काही घटना आपल्या आयुष्यात घडत असतात ज्या आपल्याला प्रेरणा देतात. अशाच एका गरीब घरातल्या मुलाच्या आयुष्यातही (Success Story) असाच एक प्रकार घडला आहे. राजस्थानच्या श्रीविजयनगर जवळील ग्रामपंचायत 6 एपीडी च्या धानी नावाच्या एका गावात राहणारा रवी सिहाग (Ravi Sihag) या शेतकऱ्याच्या मुलानं IS मध्ये AIR 18 रॅंक मिळवला आहे. त्यांचे वडिल रामकुमार (Ramkumar) यांचं अधुरं स्वप्न त्यांच्या मुलानं यावेळी पुर्ण करून दाखवले आहे. ही बातमी कळताच रवीच्या वडिलांना आनंद गगनात मावेनासा झाला. त्याचबरोबर याबातमीनं गावकऱ्यांनाही खूप अभिमान वाटला आहे. 


कोण आहे रवी सिहाग? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवी सिहाग हा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यानं गावातल्या पंचायतीतून आठवी इयत्तेपर्यंतेच शिक्षण पुर्ण केले आणि त्यानंतर त्यानं 9 वी ते 10 वी पर्यंतचे शिक्षण अनुपगड येथे घेतले. त्यानंतर रवीनं श्री विजयनगर येथील न्यू होप मॉडेल स्कूलमध्ये 11 वी ते 12 वी पर्यंतचे शिक्षण घेतले. आपलं अधुरे राहिलेले स्वप्न पुर्ण व्हावेत म्हणून त्यांनी त्यांच्या चार मुलांना लिहायला शिकवले. मोठी मुलगी वळगता दोन मुली सरकारी नोकरीत आहेत. तर तीन मुलीनंतरचे रविकुमार सिहाग यांनी मात्र त्यांच्या करिअरचा वेगळा मार्ग निवडला आणि दोनदा युपीएससीची (UPSC Exam) परीक्षा उत्तीर्ण केली आहे. 


बहिणीची पहिली प्रतिक्रिया 


आपल्या भावाच्या यशाची माहिती देताना रवीची बहीण रवीना म्हणाली की, रवी लहानपणापासूनच अभ्यासात खूप हूशार होता. आमच्या तो धाकटा असल्यानं त्याचे घरी खूप लाड केले गेले आहेत. कितीही अपयश आले तरी त्यानं अभ्यासात कधीच हार मानली नाही. त्यानं धीरगंभीरपणानं आपलं काम केलं. एका गावातून तो शहरात गेला आणि त्यानं आपलं स्वप्न पुर्ण केलं आहे. आज ही परीक्षा यशस्वी पास करून त्यानं आपच्या वडिलांचे स्वप्न पुर्ण केले आहे. त्यामुळे आमच्या घरात आनंदचं वातावरण पसरलं आहे. 


युपीएससीसारख्या कठीण परीक्षेत लोकं पुढे जाण्यासाठी भरपूर परिश्रम करताना दिसतात. त्याचबरोबर अनेकदा अपयश येऊनही ते आपल्या जिद्दीच्या जोरावर परत पुन्हा उभे राहतात आणि वर जातात, यशस्वी होतात. त्यांच्या जिद्दीला जेवढी दाद द्यावी तेवढीच कमी आहे. त्यांचा असा हा जीवनप्रवास पाहून आपल्यालाही प्रेरणा मिळते आणि रवीचा जीवनसंघर्ष पाहूनही आपल्यााला नक्कीच प्रेरणा मिळेल.