उत्तर प्रदेशातील इटावह जिल्ह्यात मोठ्या बहिणीने आपल्या दोन बहिणींचा अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी मोठ्या बहिणीला अटक केली आहे. दरम्यान, आरोपीने ज्याप्रकारे आपल्या लहान बहिणींची हत्या केली आहे, ते पाहून पोलीसही हादरले आहेत. फावड्याच्या सहाय्याने आरोपी बहिणीने आपल्या दोन्ही बहिणींचा गळा कापला. पोलिसांनी आरोपी बहिणीला अटक केली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या 7 आणि 4 वर्षाच्या बहिणींनी नको त्या अवस्थेत पाहिलेने मोठ्या बहिणीने दोघींनाही ठार केलं. घऱात कोणीही नसताना आरोपी 20 वर्षीय तरुणीने दोघींचा गळा कापला. फावड्याच्या सहाय्याने तरुणीने दोन्ही बहिणींचा गळा कापून त्यांची हत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, हत्येनंतर तरुणीने सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असंही पोलिसांनी सांगितलं आहे. 


सोमवारी 7 आणि 4 वर्षाच्या दोन बहिणींचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. राहत्या घऱात त्यांचे मृतदेह आढळले होते. घटना घडली तेव्हा दोन्ही मुली घऱात एकट्याच होत्या. मृतदेह सापडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. यानंतर तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. 


कानपूर झोनचे पोलीस महानिरीक्षक प्रशांत कुमार आणि फॉरेन्सिक टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली होती. यानंतर तपासाला सुरुवात झाली होती. पोलिसांनी सर्व कुटुंबीयांची चौकशी केली. यावेळी मुलींच्या आईने पोलिसांना सांगितलं की, मी कुटुंबातील इतर सदस्यांसह संध्याकाळी 5 वाजता शेतात चारा गोळा करण्यासाठी गेले होते. जेव्हा मी घरत परत आले तेव्हा घऱाचा दरवाजा उघडा होता आणि आत मुलींचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. 


पोलिसांनी कसून चौकशी केली असता मोठी बहिण अंजलीने आपणच त्यांची हत्या केल्याची कबुली दिली. बहिणींना आपल्याला नको त्या अवस्थेत पाहिलं असल्यानेच फावड्याच्या सहाय्याने त्यांची हत्या केल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने कपडे धुतले आणि फावड्यावरील रक्तही पुसलं होतं असं पोलिसांनी सांगितलं आहे.  


"पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्यांना रक्ताचे डाग असणारं फावडं सापडलं. ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय आम्हाला घऱात धुवून सुकवण्यासाठी टाकलेले कपडेही सापडले," अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. तपासादरम्यान अंजलीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास आहेत.