UPSC WALA LOVE: ‘यूपीएससी वाला लव कलेक्टर साहिबा’ नावाचं पुस्तक सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे. प्रत्येकजण त्यांचं कौतुक करत आहे. तसंच लेखकावर स्तुतीसुमनं उधळली जात आहेत. मूळचा जोधपूरचा असणारा कैलाश मांजू बिष्णोई याने युपीएससीची तयारी करताना हे पुस्तक लिहिलं होतं. या पुस्तकातून युपीएससीसाठी तयारी करणाऱ्या प्रत्येक एस्पिरेंटचा संघर्षही दिसत आहे. या पुस्तकात सांगण्यात आलेली गोष्ट खऱ्या आयुष्यावरुन प्रेरणा घेऊन लिहिण्यात आली असली तरी त्यातील काही पात्र काल्पनिक आहेत. तर काही पात्र मात्र लेखकाची कहाणी सांगत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पुस्तकातील मुख्य पात्र प्रशिक्षण घेणारा आयएएस अधिकारी आहे. पुस्तकातून आयुष्य आणि आयएएस अधिकारी होण्यासाठीचा संघर्ष उलगडण्यात आला आहे. आयएएसमध्ये निवड झाल्यानंतर लबासनाच्या प्रशिक्षणादरम्यान घडणाऱ्या घडामोडी, यासह मित्रांच्या गोष्टी या पुस्तकात गुंतवून ठेवतात. वास्तविक कथेपासून प्रेरित होऊन कैलास मंजूने त्यात काही काल्पनिक पात्रही जोडले आहेत. चार युपीएससी उमेदवार मित्रांसह यामध्ये एका तरुणाची गोष्टही आहे जो मोठी स्वप्ने पाहतो आणि समाज-मित्रांकडून टोमणे ऐकल्यानंतर आपल्या ध्येयाप्रती दृढ राहतो.


यासह करोनादरम्यान स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नेमका कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला याबद्दलही पुस्तकात सांगण्यात आलं आहे. ही गोष्ट प्रेम आणि आयएएस यांच्यातील एकाची निवड करण्यासंबंधी आहे. पैसा, पद, पॉवर आणि सामाजिक स्थान याच्यापेक्षा प्रेमाला जास्त महत्व देत गिरीश आणि एंजेल एकमेकाच्या पाठीशी भक्कम उभे राहिले आणि अखेर एकमेकांचे झाले. 


चित्रपट बनवण्याची तयारी सुरु


राजस्थानच्या जोधपूरमध्ये जन्मलेल्या कैलाश मंजू बिश्नोईने जोधपूरमधूनच शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि जोधपूरच्या प्रसिद्ध विद्यापीठ जयनारायण व्यासमधून पदवी घेऊन यूपीएससीची तयारी सुरू केली. तयारी दरम्यान, त्याने हिंदी आणि इतिहासात एमए केले आणि यूजीसी नेट-जेआरएफ परीक्षा उत्तीर्ण केली. तयारी सुरू असतानाच फेब्रुवारी 2022 मध्ये पुस्तक लिहिण्याचा विचार केला आणि संपूर्ण पुस्तक लिहून 5 महिन्यांत प्रकाशित केले. वाचकांना हे पुस्तक इतके आवडले की ते अनेक भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक ऑनलाइन विक्री साइट्सवर सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकांपैकी एक ठरलं असून लाखो प्रती विकल्या गेल्या, ज्यामुळे आतापर्यंत करोडो रुपयांची कमाई झाली आहे. यासोबतच कथेवर चित्रपट बनवण्याच्या ऑफर्सही येत आहेत.