मुंबई : चोरीच्या अनेक घटना आपण पाहिल्या, ऐकल्या असतील. मात्र अशी घटना आपण पाहिली नसेल. कारण या घटनेत चक्क मुग्यांनी सोने चोरी केल्याची घटना घडलीय. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. आता या प्रकरणात आता मु्ग्यांना नेमकी शिक्षा काय ठोठावायची हा प्रश्न समोर येत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्याचप्रमाणे आता हा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.एका आय़एएस अधिकाऱ्य़ाने हा व्हिडिओ शेअर केला आहे.    


व्हिडिओत काय?


व्हायरल व्हिडिओत मुंग्यांचा एक गट सोन्याची साखळी घेऊन जाताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अनेक लहान मुंग्या त्यांच्या शरीराच्या आकारापेक्षा मोठी सोन्याची साखळी हळू हळू घेऊन जाताना दिसत आहेत. व्हायरल होत असलेली क्लिप पाहून असे वाटते की जणू काही मुंग्या या सोन्याची साखळी तस्करी करत आहेत. 



दरम्यान अनेक नेटकरी मुंग्या साखळी चोरी करत असल्याचे पाहून शॉक झाले आहेत. तर काही नेटकरी या मुग्यांना चोरीच्या आरोपाखाली काय शिक्षा देणार अशा प्रश्न उपस्थित करत आहेत.तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. 


सात सेकंदांच्या या व्हिडिओला IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओला एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच अनेक लोक या व्हिडिओवर कमेंट्सद्वारे आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.