shocking News : शारिरीक संबध आहे प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील खाजगी आणि त्यांच्यातील नातेसंबध अधिक घट्ट करणारा क्षण असतो. मात्र, बऱ्याच जोडप्यांमध्ये शारिरीक संबध ठेवताना मतभेद होतात. बऱ्याचदा पुरुषांकडून याचा अतिरेक देखील होतो. अशीच एक भयंकर घटना उत्तर प्रदेशात(Uttar Pradesh) घडली आहे.  एका रात्रीत दोनदा शरीर संबध ठेवण्यावरुन(physical relations) एका विवाहितेचा मृत्यू झाला आहे. या महिलेचा मृत्यूला तिचा पतीच जबाबदार आहे. 
उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे ही घटना घडली आहे. आरोपी पतीने मृत पत्नीचा मृतदेह गोणीत बांधून मुरादाबादच्या जंगलात फेकून दिला. यांनतर आरोपीने अमरोहा शहर पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपीच्या तक्रारीनंतर बेवारस मृतदेह शोधण्यासाठी तपास केल्यानंतर तक्रारदार पती हाच त्याच्या पत्नीच्या मृत्यूला जबाबदार असल्याची धक्कादायक माहिती मुरादाबाद पोलीसांच्या हाती लागली.  आरोपी हा व्यवसायाने बेकरीचालक आहे. तो अमरोहा नगर कोतवाली भागात आपल्या पत्नीसह राहत होता. 


आरोपीने एका रात्रीस पत्नीसह दोनवेळा शरीर संबधन प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. एकदा शरीर संबध ठेवल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा त्याने पत्नीवर शरीर संबध ठेवण्यासाठी दबाव आणला. पतीने दुसऱ्यांदा शरीर संबध ठेवण्याचा प्रयत्न केला.
यावरुन दोघांमध्ये वाद झाले. आरोपीने पत्नीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती त्याला विरोध करत राहिली. यामुळे संतापाच्या भरात पतीने पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली. पत्नीच्या मृत्यूनंतर तो भयभित झाला.


आपण पकडले जाऊ नये यासाठी त्याने पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. मृतदेह सापडला तरी पत्नीची ओळख पटू नये यासाठी सर्व प्रथम त्याने मृत पत्नीचे केस कापले. यानंतर एक गोणी आणून त्यात त्याने पत्नीचा मृतदेह भरला. यानंतर त्याने ही गोणी मुरादाबादच्या जंगलात फेकून दिली. 


दुसरीकडे आरोपीने पत्नी बेपत्ता झाल्याचा बनाव रचत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांना गोणीत भरलेला मृतदेह आढळून आला. आरोपीने आधी स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पत्नीच्या हत्येची कबूली दिली.