हरियाणाच्या करनाला येथील एक अजब प्रकरण समोर आलं आहे. येथे एक व्यक्ती आपली पत्नी आणि 4 मुलांना सोडून विवाहित मेहुणीसह फरार झाला. विशेष म्हणजे जिच्यासोबत तो पळून गेला आहे तिलाही पाच मुलं आहे. नातेवाईकांनी पोलीस ठण्यात तक्रार केली असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचं नाव सलीम असून तो फरुखाबादचा राहणारा आहे. आपल्या पत्नीच्या बहिणीला घेऊन तो फरार झाला आहे. ही घटना समोर आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. याचं कारण विवाहित मेहुणीला 5 मुलं आहेत. त्यात त्यालाही 4 मुलं असून पत्नी पाचव्यांदा गर्भवती आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, त्याची पत्नी पाचव्यांदा गर्भवती झाली तेव्हा तिची देखभाल करण्यासाठी मेहुणीला घरी आणलं होतं. यानंतर तो तिलाच घेऊन पळून गेला आहे. भावोजी-मेहुणी फरार झाल्याचं कुटुंबीयांनाही 5 दिवसांनी समजलं. यानंतर त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 


पीडित कुटुंबाने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, आरोपी उत्तर प्रदेशच्या फरुखाबाद येथील राहणारा आहे. करनालच्या घरौंडा येथील एका गावात तो वास्तव्याला आहे. त्याला चार मुलं असून, पत्नी गर्भवती आहे. पत्नीची देखभाल करण्यासाठी तो मेहुणीला घेऊन आला होता. वारंवार विनंती करत असल्याने कुटुंबीयांनी महिलेला भावोजींसह पाठवून दिलं होतं. दोघांमध्ये बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध होते. पण कुटुंबीयांना याची काहीच कल्पना नव्हती. 


पोलिसांनी दाखल केला गुन्हा


दोघांनी पळ काढून 6 ते 7 दिवस उलटले असले तरी अद्याप त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. पोलिसांसह नातेवाईकही त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान लवकरच दोघांचा शोध लावू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.