दिल्ली पोलिसांनी कर्मचाऱ्यांवर हात उगारणाऱ्या मुलाला आणि त्याच्या पित्याला अटक केली आहे. पोलिसांनी सायलेन्सर मॉडिफाइड केला असल्याने तरुणाल रोखलं होतं. यानंतर त्याने आपल्या वडिलांना घटनास्थळी बोलवलं. यावेळी त्याने वडिलांसह पोलिसांना मारहाण केली. या हाणामारीत पोलीस निरीक्षक आणि कॉन्स्टेबल जखमी झाले आहेत. रविवारी संध्याकाळी दिल्लीच्या जामिया नगरमध्ये ही घटना घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आसीफ नावाच्या तरुणाला थांबवलं होतं. आसिफ रॉयल एनफिल्ड चालवत होता. यावेळी त्याच्या बाईकच्या सायलेन्समधून प्रमाणापेक्षा जास्त आवाज येत होता. पोलिसांनी त्याला थांबवून तपासलं असता त्याने सायलेन्सर बेकायदेशीरपणे मॉडीफाय केला असल्याचं समोर आलं. यामुळे सायलेंसर जोराज आवाज करत होता आणि मोटर वाहन कायद्याचं उल्लंघन करत आवाज मर्यादा ओलांडत होता. 


पोलिसांनी थांबवल्यानंतर 24 वर्षीय आसिफने आपले वडील रियाझुद्दीन यांना फोन करुन घटनास्थळी बोलवलं. यावेळी त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलेली दुचाकी जबरदस्ती नेण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षकाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता रियाझुद्दीनने त्याला पकडलं. यावेळी आसीफने त्याच्या डोळ्याखाली बुक्की मारली असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. यावेळी त्यांनी इतर पोलीस कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली. 


एका अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्ही आरोपी आसिफ आणि त्याच्या वडिलांविरुद्ध सरकारी कर्मचाऱ्याला त्याचं कर्तव्य बजावण्यात अडथळा आणल्याबद्दल आणि एसएचओ आणि ड्युटीवर असलेल्या इतर पोलिस अधिकाऱ्यांवर शारीरिक हल्ला केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे." जखमी पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सामान्य असल्याचे सांगण्यात येत आहे.