Viral Video: सध्या अनेक ट्रेडिंग व्हिडीओज (Trending Video) हे व्हायरल होत असतात त्यामुळे आपल्यालाही अनेकदा असा प्रश्न पडतो की नक्की हे व्हिडीओज इतके का व्हायरल (Viral Video) होत आहेत. कधी कधी वाटतं या व्हिडीओंमध्ये असं आहे तरी काय, की ते इतके व्हायरल होत आहेत. त्यामुळे त्यात काय आहे हे पाहण्यासाठी मुद्दामून त्या व्हिडीओला प्ले (Videos played) करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत (Trending Videos on Internet) सध्या आपण पाहू शकतो की एक माणूस चक्क विजेच्या खांबाला लटकलेला आहे. त्यामुळे आपल्यालाही असा प्रश्न पडेल की, बापरे! हा वर कसा काय गेला? होय, कुणालाही असाच प्रश्न पडू शकतो. परंतु हा वर कसा चढला यापेक्षा त्याला खाली कसं उतरवलं हे पाहणं रंजक आहे. (a man hanging on billboard for many hours finally rescued by people in telgana)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत एक माणूस चक्क विजेच्या खांबाला लटकलेला दिसतो आहे. परंतु नक्की हा माणून तिथं वर चढलाच कसा यावर अनेकांना प्रश्न पडला. हा व्हिडीओ तेलंगणा (Telangana Man Hanging) इथला आहे. सध्या हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होतो आहे. त्यामुळे हा व्हिडीओ अनेकांसाठी उत्सुकतेचा विषय बनला आहे. हा व्हिडीओ साधारण 90 सेकंदाचा आहे. त्यामुळे या छोट्याश्या व्हिडीओनं पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला आहे. 


हल्ली लोकांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण खूप वाढू लागले आहे. त्यातून आपल्यालाही अनेकदा अशा माणसांपासून काळजी घ्यावी लागते. कधी कुठेही अशी माणसं आपल्याला दारू पिऊन पडलेली दिसतात. त्यामुळे अनेकदा त्यांच्यामुळे अनेकांना त्रासही होतो. सध्या या बातमीनं पुन्हा एकदा हा प्रश्न निर्माण झाला आहे. हा माणूस भर ट्रॅफिकमध्ये (Traffic) वर लटकलेला दिसला त्यामुळे लोकांची गर्दी जमू लागली. त्याला वाचवण्यासाठी लोकं आरडाओरड करू लागले. शेवटी जमलेल्या गर्दीतून आणि ट्रॅफिकमधून एक बस (Bus rescued) आणली गेली आणि त्याद्वारे त्याला हळूहळू खाली उतरवण्यात आले. लोकांच्या म्हणण्यानुसार, हा माणूस बराच वेळ तिथं लटकून होता. 


हेही वाचा - Prajakta Mali: 'प्राजक्तराज'ची अभिनेता सोनु सूदलाही भूरळ, प्राजक्ता माळीकडून खास पोस्ट शेअर


तिथं एक बस आणली गेली आणि बरोबर त्याच्या खाली उभी केली. खाली आल्यावर त्याला त्याच्या घरांकडे सुपूर्द करण्यात आले.



तो शेवटी, त्याच्या परिवारासोबत घरी गेला. हा माणूस कोण, आणि कुठून आला होता याची अद्याप फारशी माहिती समोर आली नाही परंतु खाली उतरल्यावर मात्र तो दारू (Beer) प्यायलेला होता असे कळते.