Gujarat Crime News: आपल्याच प्रेयसीवर तरुणीने बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात बलात्कार आणि शारिरीक अत्याचार (physically assaulting) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने तरुणीच्या गुप्तांगात मिरची पावडर टाकत कौर्याची परिसीमा गाठली आहे. तरुणीची प्रकृती गंभीर असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टर सतत तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निकुंज कुमार अमरित भाई पटेल असं आरोपीचं नाव आहे. निकुंज हा विवाहित होता. तसंच त्याची पत्नी त्याच्यापासून वेगळी दुसऱ्या गावात राहत होती. आपण विवाहित आहोत ही माहिती त्याने आपल्या प्रेयसीपासून लपवली होती. आपण अविवाहित असल्याचं सांगत त्याने तिला आपल्या जाळ्यात ओढलं होतं. 


पण काही दिवसांनी प्रेयसीला त्याचं सत्य समजलं. यानंतर दोघांमध्ये भांडणं होऊ लागली. तरुणीने यानंतर निकुंजपासून अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 


प्रेयसी आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याने निकुंज संतापला होता. या संतापात त्याने केबल वायरने प्रेयसीला मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. इतकंच नाही तर त्याने तिच्या गुप्तांगात मिरची पावडर टाकली. यानंतर त्याने तरुणीला जर तिने या घटनेची वाच्यता केली तर तिचे खासगी फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली. 


तरुणी गंभीर जखमी असल्याने तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं. यानंतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. पोलिसांनी कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. 


राजस्थानमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार


राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील रोहत पोलीस स्टेशन परिसरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना तरुणाने तिला आपल्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. याबाबत नातेवाईकांनी रोहत पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली की एक महिन्यापूर्वी मी आणि माझी पत्नी घरी नव्हतो, माझी अल्पवयीन मुलगी घरी एकटी होती. मुलगी घरी एकटी पाहून महेंद्रचा मुलगा गोपाराम बंजारा याने अल्पवयीन मुलीला फूस लावून आपल्या घरी नेले. जिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला.


अल्पवयीन मुलीची आई घरी आली तेव्ही ती घऱात नव्हीत. त्यांनी शेजारी पाहिलं तर महेंद्रच्या घरी मुलगी रडत होती. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. .