Crime News: आजोबांनीच आपल्या 15 वर्षाच्या नातीवर टाकला हात, तिला म्हणाले `10 रुपये घे आणि...`
Crime News: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) आजोबांनीच आपल्या 15 वर्षांच्या नातीवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर या घटनेची कुठेही वाच्यता करु नये यासाठी त्याने आपल्या नातीच्या हातात 10 रुपयांची नोट टेकवली. पोलिसांनी आरोपी आजोबाला बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत.
Crime News: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एका 60 वर्षाच्या आजोबांनी आपल्याच 15 वर्षाच्या नातीवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या आरोपी आजोबाला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस तक्रारीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीला घटनेची वाच्यता कुठेही करु नये यासाठी 10 रुपये दिली होते. मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
मुलीच्या आईने पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, आपण मुलीसह शेळ्यांना चरण्यासाठी घेऊन गेली असता आरोपी आजोबा तिथे पोहोचला होता. यावेळी त्याने मला घरी जाण्यास सांगितलं आणि मुलीला लाकडं कापण्यासाठी कुऱ्हाड घेऊन येण्यास सांगितलं. मुलगी कुऱ्हाड घेऊन परतली असता, त्याने तिला शेतात नेलं आणि बलात्कार केला. यावेळी त्याने मुलीला याबद्दल कुठेही सांगू नको सांगत 10 रुपये दिले.
पाण्यासाठी तेथून निघालेल्या एका व्यक्तीने हा सगळा प्रकार पाहिला आणि आरडाओरड सुरु केली. यानंतर जमलेल्या लोकांना आरोपी आजोबाला मारहाण केली आणि पोलिसांकडे सोपवलं. मुलीच्या आईलाही या घटनेची माहिती देण्यात आली.
गुलरिहा पोलीस ठाण्याचे प्रमुख मनोज कुमार यांनी सांगितलं की, पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. याप्ररणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं असून पुढील चौकशी सुरु आहे.