पत्नीला लोक `चोर` म्हणत होते, पाणीपुरीवाल्याने घेतला टोकाचा निर्णय; झोपेतच ठार केलं अन् नंतर...; पोलीसही चक्रावले
Crime News: बंगळुरुत (Bengaluru) 37 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या (Murder) करुन पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं. कर्ज फेडण्यास अयशस्वी ठरत असल्याने लोक तिला चोर म्हणत असल्याने पतीने हा निर्णय घेतला. दरम्यान यानंतर तो आत्महत्या करणार होता, पण तेवढी हिंमत एकवटू शकला नाही. अखेर त्याने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं.
Crime News: बंगळुरुत (Bengaluru) 37 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या (Murder) केल्याची एक घटना समोर आली आहे. आरोपी पती आपल्या पत्नीला बंगळुरु येथून मंगळुरुला घेऊन आला. यानंतर त्याने पत्नी झोपेत असतानाच तिची गळा दाबून हत्या केली. मंगळुरुत असताना लोक पत्नीवर चोरीचा आरोप करत तिला चोर म्हणत होते. यामुळेच आरोपी पतीने तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान पत्नीच्या हत्येनंतर तो आत्महत्या करणार होता, पण तेवढी हिंमत एकवटू शकला नाही. अखेर त्याने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पीडित पत्नीची ओळख पटली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय सरिता आपला पती थारनाथसह मंगळुरूहून कर्नाटकच्या राजधानीत स्थलांतरित झाली होती. तिच्यावर चोरीचे आरोप होत असल्याने हा निर्णय घेतला होता. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरुत आल्यानंतरही त्यांना ओळखणारे चोर असा उल्लेख करत त्यांना त्रास देत होते.
थारनाथचं शहरात पाणीपुरीचं दुकान आहे. त्याने 11 लाखांचं कर्ज घेतलं होतं. पण ते फेडण्यात तो असमर्थ ठरला होता. यामुळे त्याने पत्नी सरिताची हत्या करत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपी पतीने पत्नी झोपेत असतानाच रशीने गळा दाबून तिची हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर आपण आत्महत्या करायची असा निर्णय त्याने घेतला होता. पण तो हिंमत एकवटू शकला नाही. अखेर त्याने घरमालकाला फोन करुन घटनेची माहिती दिली. नंतर त्याने पोलीस स्थानक गाठलं आणि आत्मसमर्पण करत पोलिसांना आपण केलेल्या गुन्ह्याची माहिती दिली.
यानंतर पोलीस सत्यता पडताळून पाहण्यासाठी आरोपी पतीला घेऊन घटनास्थळी गेले. त्याने खरंच हत्या केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस सध्या त्याची चौकशी करत आहेत. हत्येमागे अन्य काही कारण आहे का याची माहिती पोलीस घेत आहेत.