एखादी व्यक्ती बदला घेण्यासाठी किती वर्षं वाट पाहू शकते याची प्रचिती देणारी एक घटना समोर आली आहे. वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तरुणाने तब्बल 22 वर्षं वाट पाहिली. यानंतर त्याने ज्याप्रकारे आपल्या वडिलांची हत्या झाली होती, अगदी त्याच प्रकारे कथित आरोपीला ठार केलं. पोलिसांना सुरुवातीला हा अपघात वाटत होता. पण नंतर जेव्हा त्यांनी सीसीटीव्ही तपासलं तेव्हा ही थंड डोक्याने करण्यात आलेली हत्या असल्याचं उघड झालं. त्याने कित्येक दिवसांपासून या हत्येचा कट आखला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

22 वर्षांपूर्वी राजस्थानात झालेल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तरुणाने अहमदाबादमध्ये सुरक्षारक्षकाच्या अंगावर एसयुव्ही घालून त्याला ठार केलं. मागील अनेक दिवसांपासून त्याने या हत्येची योजना आखली होती. 


तख्तसिंग हा बोडकदेव येथे सुरक्षारक्षकाचं काम करत होता. सायकवरुन घऱी परतत असताना त्याला एक एसयुव्हीने धडक दिली होती. 1 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता झालेल्या या अपघातात त्याचा मृत्यू झाला होता.


अपघातानंतर घटनास्थळी उपस्थि प्रत्यक्षदर्शींनी त्वरीत जीप चालक गोपालसिंग याला पकडून एन डिव्हिजन पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले. पोलिसांनी सुरुवातीला अपघाताची नोंद केली होती. मात्र पीडित आणि चालक दोघेही मूळचे राजस्थानी असल्यामुळे संशय निर्माण झाला तेव्हा या प्रकरणाने वळण घेतले.


पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता गोपालसिंग हा तख्तसिंगची वाट पाहत होता आणि जाणुनबुजून धडक देत असल्याचं उघड झालं. घटनेनंतर गोपालसिंगच्या चेहऱ्यावर पश्चाताप दिसत नसल्याने संशय आणखी बळावला आणि पोलिसांनी सखोल तपास सुरु केला. 


चौकशीदरम्यान, गोपालसिंगने 22 वर्षांपूर्वीच्या घटनेचा सूड घेतल्याचं उघड झालं. केलं. 2002 मध्ये, राजस्थानच्या जैसलमेरमध्ये गोपालसिंगचे वडील हरिसिंह आणि तख्तसिंह यांच्यात भांडण झालं होतं यानंतर तख्तसिंगने हरिसिंग यांच्या अंगावर एसयुव्ही घातली होती. यानंतर तखतसिंगला तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.


शिक्षा भोगल्यानंतर तीन वर्षांपूर्वी तख्तसिंग आपली हत्या होईल या भितीपोटी अहमदाबादमध्ये स्थलांतर केलं होतं. आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या निर्धाराने, गोपालसिंगने अत्यंत काटेकोरपणे हत्येची योजना आखली. त्याने तीन दिवस अगोदर डीसा येथून बोलेरो खरेदी केली आणि संपूर्ण परिसराची पाहणी केली.


1 ऑक्टोबरच्या सकाळी, त्याने आपल्या तख्तसिंगने ज्याप्रकारे आपल्या वडिलांची हत्या केली अगदी त्याचप्रकारे त्यालाही ठार केलं. पोलिसांनी सुरुवातीला रस्ते अपघाताचा गुन्हा दाखल केला होता, ज्याचे आता खुनाच्या गुन्ह्यात वर्गीकरण करण्यात आले आहे. पोलीस याप्रकऱणी पुढील तपास करत आहेत.