मुंबई : Aarogya Setu App : आरोग्य सेतू अ‍ॅपवर आधीपासूनच नोंदणीकृत यूजर्स अ‍ॅपवरून 14-अंकी यूनीक आयुष्मान भारत आरोग्य खाते (ABHA) क्रमांक मिळवू शकतात. आणि या क्रमांकाचा वापर करून, हे यूजर्स त्यांचे सर्व वैद्यकीय रेकॉर्ड (Medical Records)  आयुष्मान भारत आरोग्य खात्यावर (ABHA) सहजपणे अपलोड करू शकतात. या सुविधेसह, यूजर्स त्यांच्या आरोग्याच्या नोंदी एकाच ठिकाणी ठेवू शकतात.


प्रत्येक नागरिकाचा हेल्थ आयडी बनवणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारने आयुष्मान भारत डिजिटल मिशन लॉन्च केल्यानंतर, प्रत्येक नागरिकाचे हेल्थ आयडी तयार करण्याचे म्हटले होते. गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या उपचारात ही योजना महत्त्वाची भूमिका बजावत असून डिजिटल पद्धतीने ही योजना अधिक यशस्वी होईल, केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. याचा उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी केला होता.


रुग्ण आणि डॉक्टर दोघांसाठी सोयीस्कर


माहिती देताना पीएम मोदी म्हणाले होते की, हेल्थ आयडीच्या मदतीने रुग्ण आणि डॉक्टर (Patients And Doctors) दोघेही त्यांचे रेकॉर्ड तपासू शकतात. यामध्ये हॉस्पिटल-क्लिनिक-मेडिकल स्टोअर्ससह(Hospital-Clinics-Medical Stores) डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांची (Health Workers) नोंदणी होणार आहे.


दरम्यान, Aarogya Setu App 12 कोटींहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आहे. या अ‍ॅपमध्ये यापूर्वीही अनेकवेळा नवीन फीचर्स जोडले गेले आहेत. लसीकरण झालेल्या लोकांची आरोग्य सेतू अ‍ॅप खात्यावर दिसण्यासाठी ब्लू टिक असो किंवा ब्लू शील्ड असो किंवा कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या आरोग्य स्थितीबद्दल माहिती देणारे वैशिष्ट्य या अ‍ॅपवर नव्याने फीचर जोडली गेली आहेत.