कन्नौज : समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव हे पत्नी डिंपल यांची प्रचार सभा सुरू होण्याआधीच एक अजब प्रकार घडला. सभा सुरू व्हायला काही वेळ असतानाच एक बैल मैदानात घुसला आणि सगळीकडे पळापळ सुरू झाली. या सुरु असलेल्या गोंधळामुळे मायावती आणि अखिलेश यांचे हॅलीकाँप्टप बराच वेळ आकाशातच घोंघावत राहीले. अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. त्यानंतर पोलीस प्रशासन आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने बैलाला मैदानाच्या बाहेर काढण्यात आले. त्यानंतर नेत्यांचे हॅलीकाँप्टर जमीनीवर उतरू शकले. याप्रकरणावरून अखिलेश यांनी आपल्या भाषणात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


खूप मेहनतीनंतर बैलाला मैदानाबाहेर काढण्यास यश आले. बैल आपली तक्रार घेऊन इथे आला होता.



हरदोईवाले हॅलीकाँप्टर आले असे त्याला वाटले असेल असे अखिलेश म्हणाले. आम्ही डीजीपींना फोन करुन सांगितले की आमची सभा उधळण्यास इथे कोणतरी आला आहे.  त्यांना काही समजले नाही. मग त्यांनी पुन्हा प्रश्न विचारला कोण आला आहे ? मग मी त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितल्याचे अखिलेश यांनी प्रचार सभेदरम्यान सांगितले.