Uttar Pradesh Crime News : एक विवाहीत महिला सात महिन्याच्या बाळाला सोडून बॉयफ्रेंडसह पळून गेली (Extramarital Affair). मात्र, तिच्या या कृत्याची तिला भयानक शिक्षा मिळाली आहे. बॉयफ्रेंडसह पळून गेल्यावर तिच्यासह असं काही घडल की ज्याची तिने कल्पनाही केली नव्हती. उत्तर प्रदेशात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे (Uttar Pradesh Crime News).


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे प्रकरण शाहजहांपूर जिल्ह्यातील अल्लागंज पोलिस स्टेशनच्या हद्दीतील आहे. सात महिन्याच्या बाळाला सोडून बॉयफ्रेंडसह पळून  गेलेल्या महिलेचा भीषण अपघातात मृत्यू झाला. महिलेला प्रियकर अपघातात गंभीर जखमी झाला आहे. मृत महिला आपल्या कुटुंबियांसह ती राहत होती. तिला सात महिन्याचे लहान बाळ देखील आहे.  मृत महिला तिच्या प्रियकराच्या प्रेमात वेडी झाली होती. यामुळेच तिने प्रियकरासह पळून जाण्याचा निर्णय घेतला.


सात महिन्याच्या लेकराचा विचार न करता त्याला वाऱ्यावर सोडून ही महिला घर सोडून प्रियकरासह फारार झाली. मृत महिला आणि तिचा प्रियकर दोघेही बाईकने जात होते. मात्र, वाटेतच त्यांच्या बाईकला ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर. महिलेचा प्रियकर या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानी तात्काळ दोघांच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. यानंतर ही महिला प्रियकरासह फरार झाल्याचा प्रकार उघडकीस आला.  मृत महिलेच्या कुटुंबियांनी तिच्या प्रियकराविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.