पती आणि छोट्या बहिणीचं मंदिरात लागत होतं लग्न; पाहुण्यांच्या गर्दीत पत्नीही आली अन् मग....
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज (Prayagraj) येथे एका व्यक्तीने आपल्या मेहुणीशीच लग्नगाठ बांधली आहे. विशेष म्हणजे त्याच्या पत्नीनेच हे लग्न लावलं. आता तिघेही एकत्र एका छताखाली राहणार आहेत. नातेवाईकही या लग्नाला हजर होते.
लग्नानंतर महिलेला आपल्या पतीने आपण सोडून इतर कोणत्याही महिलेकडे जास्त लक्ष देऊ नये असं वाटत असतं. त्यामुळेच जेव्हा कधी पतीचे विवाहबाह्य संबंध समोर येतात तेव्हा महिलेवर दु:खाचा डोंगर कोसळतो. पण जर पत्नीच पतीला दुसरं लग्न करुन घऱात सवत आणण्यास सांगत असेल तर...उत्तर प्रदेशात नुकतीच अशी एक घटना घडली आहे. येथे चक्क एका महिलेनेच आपल्या पतीचं दुसरं लग्न लावलं आहे. विशेष म्हणजे, त्यांचे नातेवाईकही या लग्नाला उपस्थित होते.
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील एक अजब प्रकरण समोर आलं आहे. येथे एक तरुणी आनंदाने सवत झाली आहे. विशेष म्हणजे तिच्या बहिणीनेच हे लग्न लावून दिलं. महिलेने आनंदाने आपला पती आणि बहिणीचं लग्न लावून दिलं असून आता एकत्रच संसार करणार आहेत. मेहुणी आणि भावोजीचं हे लग्न शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
शंकरगढ जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. येथे राहणार राजकुमार मजुरी करुन पोट भरतो. रुमीशी त्याचं लग्न झालं होतं. रुमीचं आपल्या छोटी बहिणीवर फार प्रेम होतं. तिच्यापासून दूर राहणं तिला अजिबात आवडत नव्हतं. इतकंच नाही तर आपल्या छोट्या बहिणीचं अत्यंत धूमधडाक्यात लग्न लावून देऊ शकू इतके पैसेही तिच्याकडे नव्हते. यामुळे अखेर तिने आपला पती राजकुमार याची मनधरणी केली आणि लग्नासाठी तयार केलं. अखेर पती लग्नासाठी तयार झाल्यानंतर एका मंदिरात तिने पती आणि बहिणीचं लग्न लावून दिलं.
मंदिरात झालेल्या लग्नाला अनेक नातेवाईकही उपस्थित होते. यावेळी मोठी बहिण म्हणजेच पहिली पत्नीही लग्नाला हजर होती. सर्वांच्या उपस्थितीत पार पडलेलं हे मेहुणी आणि भावोजीचं लग्न चांगलाच चर्चेचा विषय ठरलं आहे.