Crime News: बिहारमध्ये (Bihar) 45 वर्षीय महिलेची अत्यंत निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली आहे. खागरिया जिल्ह्यात महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यानंतर स्थानिकांकडून आंदोलन केलं जात आहे. सुलेखा देवी यांच्यावर अज्ञातांनी हल्ला करत अक्षरश: छळ केला. आरोपींनी धारदार शस्त्राने तिची हत्या केली. दरम्यान, हत्या करण्यापूर्वी त्यांनी तिचे डोळे बाहेर काढले, स्तन कापले आणि गुप्तांगावर वार केले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुलेखा देवी (Sulekha Devi) आपल्या शेतात काम करण्यासाठी गेल्या असता आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला आहे. सुलेखा देवी यांच्या कुटुंबावर झालेला हा पहिला हल्ला झाली. याआधी 25 एप्रिल 2014 मध्ये सुलेखा देवी यांचे पती बबलू सिंग आणि त्यांच्या भावाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पतीच्या हत्येमधील आरोपीची गतवर्षी कोर्टाने जामीनावर सुटका केली. 


जमिनीच्या वादावरुन ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र हत्येचं नेमकं कारण समजून घेण्यासाठी पोलीस सध्या तपास करत आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 


पोलीस अधिकारी मनोज कुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितलं की, घटनास्थळावरुन एक चाकू सापडला आहे. या संपूर्ण घटनेचं अत्यंत कडक पद्धतीने तपास केला जाणार आहे. 


दरम्यान या हत्येमुळे त्यांच्या समाजात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. सुलेखा देवा यांच्या नातेवाईकांसह स्थानिकांनी आंदोलन करत आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. नातेवाईक आणि स्थानिकांनी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करत कित्येक तास वाहतूक रोखून धरली होती. 


पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आलं. पोलिसांनी नातेवाईक आणि स्थानिकांना आरोपी अटक केले जातील आणि कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. 


बिहारमध्ये तरुणाची हत्या


बिहारमधील बांका येथे रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी एका तरुणाच्या छातीवर गोळी झाडून हत्या केली. या घटनेत गंभीर जखमी तरुणाला राजौन सीएचसीमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेथून प्राथमिक उपचारानंतर भागलपूरला नेण्यात येत होतं. यादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मृताच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून संपूर्ण राजौन बाजारपेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भानू कुमार सिंग (30) असं या मृत तरुणाचं नाव आहे. हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.