Crime News: महिलेने आपल्याच प्रियकरावर उकळतं तेल ओतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी महिलेला अटक (Arrest) केली आहे. तामिळनाडूमधील (Tamil Nadu) एरोडे येथे ही घटना घडली आहे. प्रियकर गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रियकर लग्नास नकार देत असल्याने महिलेने हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्ती हा एका खासगी कंपनीत कामाला आहे. आपल्याच एका नातेवाईकाशी त्याचे प्रेमसंबंध होते. मीना देवी हिला त्याने लग्नाचं आश्वासन दिलं होतं. 


पण जेव्हा मीना देवीला कार्तीचा साखरपुडा होणार असल्याची माहिती मिळाली तेव्हा तिने त्याला जाब विचारला. यामुळो दोघांमध्ये अनेकदा भांडण होत होतं. पोलिसांनी सांगितलं की, जेव्हा कार्ती देवीला भेटण्यासाठी गेला होता तेव्हा कडाक्याचं भांडण झालं. त्यावेळी मीना देवीने कार्तीच्या अंगावर उकळतं तेल फेकून दिलं. 


उकळतं तेल अंगावर पडल्यानंतर कार्ती खाली कोसळला. त्याचे हात आणि चेहरा गंभीर भाजला होता. त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी धावत आले आणि त्याला रुग्णालयात घेऊन गेले. पोलिसांनी याप्रकरणी मीना देवीला अटक केली असून तपास सुरु आहे.