ग्रेटर नोएडाच्या (Greater Noida) दनकौर पोलीस ठाणे क्षेत्रात राहणाऱ्या एका तरुणाचा छिनविछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. मेरठमध्ये (Meerut) पोत्यात मुंडकं छाटलेला त्याचा मृतदेह सापडला. तरुण गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता होता. तपासादरम्यान पोलिसांना त्याचे गावातीलच एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते असं उघड झालं. यानंतर पोलिसांनी महिलेच्या पतीला ताब्यात घेतलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोहेल मोहम्मद असं या तरुणाचं नाव असून गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. यादरम्यान मेरठमध्ये त्याचा मृतदेह सापडला. सोहेलचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस सध्या तपास करत असून यादरम्यान एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध असल्याचं उघड झालं.


मंडपा गावात राहणारा सोहेल गेल्या आठवड्यात अचानक बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबाने रविवारी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. यादरम्यान सोहेलचा तीन तुकडे करण्यात आला मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. त्याचं मुंडकं धडापासून वेगळं करण्यात आलं आहे. पोत्यात भरुन मृतदेह फेकून देण्यात आला होता. मेरठ पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवत स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस याप्रकरणी तपास करत आहे. 


काय आहे नेमकं प्रकरण?


मोहम्मद यांनी रविवारी पोलीस ठाण्यात आपला 21 वर्षीय मुलगा सोहेल बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. आपला मुलगा 8 फेब्रुवारीला संशयितपणे बेपत्ता झाल्याचा दावा त्यांनी केला होता. नातेवाईकांनी सगळीकडे शोध घेतला होता, पण काहीच थांगपत्ता लागला नाही. 


यादरम्यान मेरठच्या लिसाडी गेट पोलीस ठाण्यात अज्ञात मृतदेह सापडल्यानंतर फोटो, व्हिडीओ शेअर करत त्याची ओळख पटवण्याचं आवाहन करण्यात आलं. यानंतर मोहम्मद मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोहोचले होते. त्यांनी हा मृतदेह सोहेलचा असल्याचं सांगितलं. त्याचे तीन तुकडे करण्यात आले होते. 


विवाहित महिलेशी होते प्रेमसंबंध


सोहेलचे त्याच्याच गावात राहणाऱ्या महिलेशी प्रेमसंबंध होते अशी माहिती आहे. गेल्या 6 महिन्यांपासून त्यांचे संबंध होते. तो महिलेला घेऊन फरारही झाला होता. पण नंतर पोलिसांनी महिलेला परत आणलं होतं. यानंतर दोन्ही बाजूंनी हे प्रकरण मिटलं होतं. 


पहिल्या पतीकडून घटस्फोट घेतल्यानंतर महिलेचं लग्न मेरठच्या आमीर गार्डन क्षेत्रात झालं होतं. जिथे लग्न झालं तिथेच सोहेलचा मृतदेह सापडला असल्याने संशय बळावला आहे. प्रेमप्रकरणातूनच हत्या झाल्याचा संशय आहे. मेरठ पोलीस तपास करत असून महिलेच्या पतीला ताब्यात घेतलं आहे.