आधार कार्ड या मुदतीत लिंक करा, नाहीतर पॅन रद्द?
जर तुमचं पॅन कार्ड तुम्ही आधारकार्डसोबत ३१ मार्च २०१८पर्यंत लिंक करा, नाही तर तुमचं पॅन कार्ड होवू शकतं रद्द.
नवी दिल्ली : आधार कार्ड विषयी ही सर्वात महत्वाची बातमी आहे, जर तुमचं पॅन कार्ड तुम्ही आधारकार्डसोबत ३१ मार्च २०१८पर्यंत लिंक केलं नाही, तर तुमचं पॅन रद्द होण्याची शक्यता आहे. यावर लवकरच सर्वोच्च न्यायालयाकडून लवकरच निर्वाळा येणायाची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सरकारची मुदत मान्य केली, तर ३१ मार्च २०१८ पर्यंत तुमचं आधार कार्ड लिंक करणे आवश्यक होणार आहे. कारण ज्या पॅनना आधार कार्ड लिंक नसेल ते बनावट मानून ते रद्द कऱण्यात येईल.
आधारकार्ड पॅनकार्डला लिंक करणे आवश्यक
हा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही, सराकारच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारकडून पॅन आधार लिंकची शेवटची तारीख, ३१ मार्च २०१८ दिली जाऊ शकते, जर सुप्रीम कोर्टाने ३१ मार्च २०१८ ही तारीख मान्य केली, तर याच तारखेआधी आधार आणि पॅनकार्ड लिंक करणे आवश्यक होणार आहे.
सरकारने कोर्टात मुदत वाढवण्याची तयारी दर्शवली
यापूर्वी पॅनकार्डला आधारकार्ड लिंक करण्याची मुदत ही ३१ डिसेंबर २०१७ होती, मात्र सर्वोच्च न्यायालयासमोर सरकारने ही मुदत ३ ते ४ महिन्याने वाढवण्याची तयारी दर्शवली आहे. यावरून आता आधारकार्ड पॅन कार्ड़ला लिंक करण्याची मुदत ३१ मार्च २०१८ होण्याची शक्यता आहे. मात्र यावर सर्वोच्च न्यायालयाचा शिक्का मोर्तब होणे आवश्यक आहे.
न्यायालयाच्या सूचनेनुसार लिकिंगची मुदत वाढवली
सर्वोच्च न्यायालयात आधार कार्ड पॅनकार्डला लिंक करण्याविषयी काही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने सरकारला ही मुदत वाढवण्याविषयी सूचना केली होती, त्यानुसार सरकारने ही तयारी दाखवत ही मुदत ३१ मार्च २०१८ पर्यंत वाढवून दिली जाण्याची शक्यता आहे.
आधारकार्ड अनेक सेवांसाठी लिंक कऱणे आवश्यक आहे, यात विमा पॉलिसी, विविध अनुदान योजना, यात गॅस सब्सिडीचा देखील समावेश आहे.