नवी दिल्ली : आधार कार्ड बनवण्यासाठी आता तुम्हाला फार फिरावे लागणार नाही. कारण केंद्र सरकार फेब्रुवारीपासून पोस्ट ऑफिसमध्ये आधार बनवण्याची सुविधा सुरू करत आहे. रिपोर्टनुसार, या संबंधितचे काम प्रगतीपथावर आहे. आग्रा येथे आधार कार्ड बनवण्यासीठी ६०० उमेदवारांना नियुक्त करण्यात आले आहे. पोस्ट ऑफिसचे उपनिर्देशक आर. बी. त्रिपाठी यांनी सांगितले की, लवकरच आधार कार्ड बनवण्याची सुविधा पोस्ट ऑफिसमध्ये सुरू होईल. हा सेवेचा लाभ लोक फेब्रुवारीपासून घेऊ शकतील.


आता फक्त इथे बनतील आधार कार्ड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत सीएससी आणि अन्य कंपन्यांच्या सेंटर्सवर आधार कार्ड बनवण्याची प्रक्रिया चालू होती. मात्र गेल्या सप्टेंबरपासून ही व्यवस्था बदलण्यात आली आहे. आता फक्त सरकारी कार्यालयात हे काम चालेल. आता हे काम अधिक गोपनीय करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. याची संपूर्ण जबाबदारी सरकारने पोस्ट ऑफिसवर दिली आहे.


निशुल्क केले जाईल काम


पोस्ट ऑफिसमध्ये आधार कार्ड बनवण्याचे काम निशुल्क करण्यात येणार आहे. यासाठी आग्रा पोस्ट ऑफिसमध्ये ६०० उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची आधी परिक्षा होईल. विभागीय अधिकारी लवकरच पोस्ट ऑफिसमध्ये आधार कार्ड बनवण्याचे उपकरण उपलब्ध करतील.


आधार कार्डचा डेटा पूर्णपणे सुरक्षित


आधार कार्ड तयार करणारी संस्था युआयडीएआय यांनी आधीच आधार डेटा पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. UIDAI नुसार, आधार कार्डची माहिती सार्वजनिक केली जाणार नाही. ती गोपनीय ठेवण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.