Punjab Election Result : पंजाबमध्ये `आप`ची झाडू जोरात, काँग्रेसचा सुपडा साफ
Punjab Election Result 2022 : पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष (AAP) बहुमत मिळवताना दिसत आहे. `आप` जोरदार मुसंडी मारत काँग्रेसला सत्तेतून पाय उतार केल्यात जमा आहे. पंजाब निवडणुकीत वेगळे चित्र पाहायला मिळत आहे.
मुंबई : Punjab Election Result 2022 : पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष (AAP) बहुमत मिळवताना दिसत आहे. 'आप' जोरदार मुसंडी मारत काँग्रेसला सत्तेतून पाय उतार केल्यात जमा आहे. पंजाब निवडणुकीत वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेसची हार आणि अनेक दिग्गज नेते मागे पडले आहेत. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि मोठे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनाही मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. (Aam Aadmi Party's big lead in Punjab, Congress big loss)
अनेक दिग्गज पिछाडीवर
मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणीत 'आप'ने आघाडी घेतलेली दिसून येत आहे. बहुमताचा आकडा पार केला आहे. तर सत्तेत असणारा काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. शिरोमणी अकाली दल आपला फारसा प्रभाव दाखवू शकलेला नाही. तर भाजपलाची जादू काही दिसून येत नाही. त्यामुळे मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला 'आप' सत्तेत बसणार असेच दिसून येत आहे. मुख्यमंत्री चन्नी दोन्ही जागांवर पिछाडीवर आहेत. त्याचवेळी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धूही निवडणुकीच्या रणधुमाळीत मागे पडलेले दिसत आहेत. यासोबतच माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि सुखबीर बादलही पिछाडीवर आहेत.
पंजाबचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले अमरिंदर सिंह हे पटियाला जागेवर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेरीत 3575 मतांनी पिछाडीवर होते. दुसरीकडे, मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी हे चमकौर साहिब आणि भदौर या दोन्ही विधानसभा जागांवर पिछाडीवर आहेत. आम आदमी पार्टीचे (AAP) उमेदवार चरणजीत सिंह हे चमकौर साहिब जागेवर तर भदौर जागेवर आपचे लाभ सिंह उगोके आघाडीवर आहेत.
राज्याचे पाच वेळा मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दल (एसएडी) नेते प्रकाशसिंग बादल त्यांच्या गड असलेल्या लांबी विधानसभा जागेवर 1,416 मतांनी पिछाडीवर आहेत.
'आप'कडे दोन तृतीयांश बहुमत
विशेष म्हणजे आप पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला दोन तृतीयांश बहुमत मिळताना दिसत आहे. पंजाब निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, सध्या पंजाबमध्ये आम आदमी पक्ष 90 जागांवर आघाडीवर आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 13 जागांवर, अकाली दल 9 जागांवर आणि भाजप 3 जागांवर आघाडीवर आहे.