सहाराला कोर्टाचा आदेश; दिलेल्या मुदतीत ९६६ कोटी रूपये जमा करा
सुप्रीम कोर्टाने सहारा उद्योग समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांना दणका दिला आहे. सुब्रतो रॉय यांची मुदतवाढ मागणारी याचिका फेटाळून लावत ९६६ कोटी रुपये ठरलेल्या वेळेतच जमा करा, असे आदेश दिले.
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने सहारा उद्योग समूहाचे प्रमुख सुब्रतोो रॉय यांना दणका दिला आहे. सुब्रतो रॉय यांची मुदतवाढ मागणारी याचिका फेटाळून लावत ९६६ कोटी रुपये ठरलेल्या वेळेतच जमा करा, असे आदेश दिले.
सुप्रीम कोर्टाने रॉय यांना एकूण १५०० कोटी रूपयांपैकी उर्वरीत ९६६ कोटी रूपये जमा करण्यासाठी ११ नोव्हेंबर पर्यंतची मुदत दिली होती. मात्र, ही रक्कम भरण्यास आपणास आणखी दोन महिन्यांचा कालावधी वाढवून मिळावा अशी याचिका रॉय यांनी कोर्टाकडे केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.
याचिका फेटाळून लावताना कोर्टाने म्हटले आहे की, रॉय हे कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी न्यायालयाचा प्रयोगशाळेसारखा वापर करत आहेत. याचिका फेटाळताना न्यायालयाने सहारा समुहाच्या अॅंबी व्हॅलीचा लिलावही वेळेनुसार वाढविण्याचेही निर्देश दिले. महाराष्ट्रात असलेल्या सहाराच्या अॅंबी व्हॅलीची मुल्य ३७,३९२ कोटी रूपये आहे.